आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपण जरूर या बंधने झुगारून सुरक्षिततेचा संदेश देण्यासाठी 'दिव्य मराठी'चा उपक्रम, रातरागिणींचे आज अंधारावर आक्रमण

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

साेलापूर : असुरक्षिततेची बंधने झुगारून 'माैन साेडू, चला बोलू' या निर्धाराने शहरातील हजारो महिला अंधारावर चालून जाणार आहेत. दैनिक दिव्य मराठीतर्फे रविवारी (ता. २२) अर्थात वर्षभरातील सगळ्यात मोठ्या रात्री हा महिला नाइट वॉक निघणार आहे. रात्री साडेनऊ वाजता चार हुतात्मा पुतळा येथे उद्घाटन होऊन रात्री दहा वाजता नाइट वॉकला सुरुवात होईल. शहरातील अधिकाधिक महिलांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

गर्भापासून घरापर्यंत आणि कार्यालयापासून रस्त्यापर्यंत महिला असुरक्षित असताना तितकीच बंधने त्यांच्यावर लादली जातात. रात्र ही तिची वैरी असल्याचे सांगून बंधने घातली जातात. हीच बंधने झुगारण्यासाठी दैनिक दिव्य मराठीने 'मौन सोडू, चला बोलू' हे अभियान सुरू केले आहे. या अभियानाला शहरातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. महाविद्यालयीन तरुणी, गृहिणी, विविध कार्यालयात काम करणाऱ्या महिला, उद्योजक महिला यांचा यात मोठ्या प्रमाणात सहभाग मिळतो आहे. त्यासाठी महिलांनी मोठ्या प्रमाणात नाव नोंदणी केली आहे.

महिलांनी घ्यावी ही काळजी

मौल्यवान वस्तू सांभाळाव्यात, सोन्याचे मंगळसूत्र, दागिने चैन यांची विशेष काळजी घ्यावी. चालताना त्रास होईल अशा चप्पल, सॅण्डल घालू नयेत. ड्रेस कोडचे बंधन नाही. ग्रुपच्या ओळखीसाठी ड्रेस कोड केल्यास चालेल. संपर्कासाठी दिलेल्या क्रमांकांचा अडचणीच्या वे‌ळी वापर करावा.

उद्घाटन आणि समारोप

या नाइट वॉकचा शुभारंभ शहरात रात्रीच्या वेळेत काम करणाऱ्या पाच महिलांच्या हस्ते मशाल पेटवून करण्यात येणार आहे. तर सात रस्ता दैनिक दिव्य मराठी सर्कल येथे वॉक मधील महिलांच्या हस्ते फुगे सोडून समारोप करण्यात येणार आहे.

असा असेल मार्ग

चार पुतळा येथून सुरुवात होईल. तेथून महापालिकेसमाेरून डफरीन चौक, जुना एम्प्लायमेंट चौक, संगमेश्वर कॉलेज मार्गे सात रस्ता येथील दैनिक दिव्यमराठी सर्कल.

ढोल, भजन आणि पथनाट्ये

शुभारंभावेळी रात्री ९ वाजता चार हुतात्मा पुतळा येथे ढोल पथकांचे सादरीकरण होणार आहे. ढोल पथकाडून महिलांचे स्वागत होईल. महिला मंडळांचे भजनही सादर होईल. जनजागृतीपर पथमाट्ये सादर होतील.

रविवारी रात्री साडे नऊ वाजता होणार उदघाटन, हजारो महिलांचा सहभाग

'दिव्य मराठी'च्या वतीने आयोजित नाइट वाॅक मोहिमेत सहभागी होण्यासाठी नगरसेविकांनी आवाहन केले. महापौर श्रीकांचना यन्नम यांच्यासह उपस्थित नगरसेविका (डावीकडून) स्वाती आयवळे, प्रतिभा मुदगल, सोनाली मुटकिरी, राजश्री कणके, सुनीता रोटे, अनिता काेंडी, मंगला पाताळे, वंदना गायकवाड, मेनका राठोड, श्रीदेवी फुलारे, कल्पना कारभारी, जुगनबाई अंबेवाले, राजश्री चव्हाण.

बातम्या आणखी आहेत...