NEW YEAR 2019: / NEW YEAR 2019: सूर्याची पहिली किरणे पृथ्वीवर रोज जिथे पडतात, पाहा तेथील हे छायाचित्र...

Jan 01,2019 12:02:00 PM IST

पृथ्वीवर हाेत असलेल्या सूर्याेदयाचे हे छायाचित्र अाहे. ते पृथ्वीपासून ४०० किमी उंचावरील अांतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रातून (अायएसएस) अाॅस्ट्रेलियाच्या वरील भागातून घेतले अाहे. हीच ती जागा अाहे जिथे सर्वात प्रथम सूर्यकिरणे पडतात. साेनेरी किरणांनी न्हाऊन निघालेल्या पृथ्वीचे हे दुर्मिळ छायाचित्र. नायट्राेजन व अाॅक्सिजनच्या कणांवर जेव्हा सूर्याची अल्ट्राव्हायोलेट किरणे पडतात तेव्हा असे मनाेहर दृश्य दिसते. त्याला एअरग्लाे असेही म्हटले जाते. ‘नासा’ने या वर्षीच्या सर्वाेत्कृष्ट छायाचित्राचा मान या फाेटाेला दिला अाहे. ‘आयएसएस’ २७ हजार ६०० किमी/ प्रतितास वेगाने पृथ्वीभाेवती फिरते. त्यामुळे तिथून २४ तासांत १६ वेळा सूर्याेदय व सूर्यास्त दिसताे. म्हणजे दर ९० मिनिटांनी एकदा. नाेव्हेंबरमध्ये ‘अायएसएस’ला २० वर्षे पूर्ण झाली. २० देश व ५ अंतराळ केंद्रांच्या माध्यमातून १९९८ मध्ये त्याची निर्मिती झाली. २००० पासून इथे नियमित अंतराळवीर येतात. सध्या अमेरिका, कॅनडा व रशियाचे एक-एक अंतराळवीर अाहेत.

अंतराळ केंद्रातून अंतराळवीराचा संदेश
इथून अाम्हाला पृथ्वी ही सीमा नसलेल्या एखाद्या ग्रहाप्रमाणे दिसत अाहे...
जग नववर्षाचा जल्लाेष करत असेल, तेव्हा अाम्ही पृथ्वी परिक्रमा करत असू. अाम्ही नशीबवान अाहाेत की इथून पृथ्वीला सीमा नसलेल्या ग्रहाप्रमाणे पाहत अाहाेत.

अामचा संदेश : ‘भास्कर’ सूर्याचेच नाव अाहे, त्याला सीमा नसते. नवीन वर्षात ‘भास्कर’ अाशा करताे की अाम्ही सर्व जण मेहनतीने अमर्याद अानंद मिळवू अाणि स्वत:ला मर्यादेपलीकडे जाऊन सिद्ध करू.

- ‘अायएसएस’ उभारण्यासाठी २० वर्षे लागली. खर्च ११ लाख काेटी. हे केंद्र अाजवरचे जगातील सर्वात खर्चिक ठरले.
-‘अायएसएस’वर अातापर्यंत १८ देशांचे २३४ अंतराळवीर गेले अाहेत. त्याची क्षमता ६ क्रूची अाहे. एक जण ६ महिने राहू शकताे.
- महिला अंतराळवीर पेगी व्हिस्टनच्या नावे इथे सर्वाधिक काळ राहण्याचा विक्रम. त्या ५ माेहिमांच्या माध्यमातून ६६५ दिवस राहिल्या.

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा उमेदीची सूर्यप्रभा फोटोज...

प्रकाश येता धुकेही जाईल ठरवूनी टाकू होऊन जाईल मनात येईल ते ते होऊल लढणा-याच्या पाठी देव ढळणा-याच्या मनात भेव रात्रीचाही दिवस होईल हातामंदी धरता हात हां हां म्हणता बनते बात मनामंदी समाधान राहील बघताना कधी खोल आत मंद दिव्याची तेलवात एक कवडसा उजेड देईल - दासू भल्या-बुऱ्या आठवणी असतातच सोबतीला, तरीही ताजेतवाने नवे वर्ष उगवते. तमाच्या तळाशी दिवे लावत पुन्हा नवी आशा जागवते. पोटावरच्या मेदापेक्षाही मग मनातली उमेद अधिक प्रभावी ठरते. जग सुंदर असल्याचा साक्षात्कार पुन्हा होऊन जातो. नवे वर्ष म्हणजे नवे विकल्प, नवे संकल्प, नवे प्रकल्प अशी खात्री पटत जाते. जयंत शेवतेकरांसारखा रंगचिंतक रंगमंचीय आविष्कारांमधून ही उमेद उभी करतो. कोणी दासू वैद्य, संगीता बर्वे वा आसावरी काकडे कवितेतून ही उमेद जागवतात. पार्वती दत्तांच्या पदन्यासाने वा चारुहास पंडितांच्या फटकाऱ्याने त्यावर शिक्कामोर्तब होते. फिनिक्ससारखे राखेतून झेपावलेले प्रमोद कांबळे एखाद्या शिल्पासारखी उमेद कोरतात. कधी प्रियदर्शिनी कुलकर्णींची सुरावट, तर कधी इंद्रजित भालेराव, बालाजी सुतार, मंगेश नारायण काळे यांची कविता तीच अनवट जादू करते. सचिन भोरेंचा कुंचला, रवी खंडाळकर यांचं छायाचित्रण, बालाजी जमदाडे यांचं अक्षरलेखन हेच आश्वासन प्रशस्त करत पुढं जातात. कलेचं बोट पकडलं की आयुष्याला भिडणं खरंच किती सोपं जातं ना! विविध कलाविष्कारांनी जागवलेली ही उमेद अशा ढंगात आज आम्ही घेऊन येतोय. एखाद्या वर्तमानपत्रानं केलेला हा असा पहिलाच प्रयोग ठरावा... नव्या वळणावर विसावताना ही उमेदही नवी आहे. भलेबुरे घडून गेल्यावरही ही उमेद तर असतेच मनाच्या तळाशी. कला अभिव्यक्त करते ही उमेद. आज नववर्षानिमित्त ही ‘कलात्म उमेद’; मालिका अंकभर विखुरलेली दिसेल. विविधरंगी कला माध्यमांतून व्यक्त होणारी ही उमेद नववर्षात तुमच्यापैकी प्रत्येकाच्या सोबत असावी, या शुभेच्छांसह, सप्रेम.- संपादक डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नाट्यशास्त्र विभागाचे विद्यार्थी आकाश वाघमारे, पृथ्वी काळे, मिनारू गाढे, मिनिल तारू, चिन्मय देशकर, नेहा भालेराव यांनी विभागप्रमुख प्रा. डॉ. जयंत शेवतेकर यांच्या दिग्दर्शनात नववर्षाची उमेद अभिव्यक्त केली.स्वागताची घाई निरोपाची घाई खोल मनात काही मुरलंच नाही मुरल्याशिवाय मिरवायला आवडतं चूक सुधारत नाही, याला तेच तर नडतं - इंद्रजित भालेरावये, काळाच्या भाळावर, ही अल्वार पावले रेखू, ठाय लयीत, अन् ठामपणाने चल, घावांना रोखू! - बालाजी सुतार शिवसृष्टीचे अमोघ वर्णन असलेली तुलसीदासांची रचना महागामी संचालिका पार्वती दत्ता यांनी बांधली आहे. यामध्ये कामदेव बाण सोडतात अन् तो ध्यानस्थ शिवाला जाऊन लागतो. संपूर्ण सृष्टी शिवामध्ये सामावलेली आहे. बाण लागताच सृष्टी आपली लय बदलू लागते. लतावेलींमध्ये चैतन्य संचारते. पशुपक्षी निसर्गाच्या बदलत्या रूपाने आनंदोत्साहात न्हाऊन निघतात, तर मानवही त्या चैतन्यात सृष्टीच्या तालाशी ताल धरून भावविभोर होतो. त्यामुळे नववर्षात नवचैतन्याची उमेद पाहा, असा संदेश असलेली ‘देखो बन बनियाे उमाकांत...’; ही कथक नृत्य संरचना.निरस्त तर करावीच लागेल ही जुनाट लिपी... हा काळोख लख्ख रंगवावी लागेल नव्याने ही भिंत नव्या अक्षरासाठी - मंगेश नारायण काळे आपण कचरा करतो... आपण विद्रूपीकरण करतो... स्वच्छता करणाऱ्या कर्मचाऱ्याला आपण कचरेवाला म्हणतो. हा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. कोणी तरी सुरुवात करण्याची गरज आहे. आजची छोटी सुरुवात उद्याचा मोठा बदल ठरेल हा आशावाद चित्रकाराने ‘दिव्य मराठी’;साठी खास मांडला आहे.घडवलेस तू नेत्र असे की पाषाणाला फुटला पाझर राखेमधुनी घुमू लागले नवसृजनाचे आसुसले स्वर... - आसावरी काकडे १ एप्रिल २०१८. आगीच्या दुर्दैवी घटनेत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार प्रमोद कांबळे यांच्या नगरमधील स्टुडिओची शब्दश: राखरांगोळी झाली. तीन-चार दशकांत जमवलेल्या दुर्मिळ वस्तू, चित्रे या आगीत भस्मसात झाली. पण या राखेतूनच ‘हिंदुस्तां हमारा... या भव्य प्रकल्पाचं बीज प्रमोद यांच्या मनात रुजलं. आणि फीनिक्स पक्ष्याप्रमाणे त्यांनी भरारी घेतली आहे. नव्या वर्षात नगर शहरातील नेप्ती चौकात झेप घेणाऱ्या गरुडाचे शिल्प अनेकांना प्रेरणा देईल.नवे सूर अन् नवे तराणे नव्या ऋतूंचे नवेच गाणे गंधबाव-या मुग्ध फुलांचे दरवळणारे रंग दिवाणे या जगण्याचे गीत कोवळे प्रसन्नतेचे गाऊया... सज्ज स्वागता होऊया... वर्ष असे हे नवेनवेसे सारे काही हवेहवेसे विसरुनी जाऊ जुने मागचे सुसवेफुगवे जराजरासे आनंदाच्या क्षणाक्षणांना कवेत आपुल्या घेऊया... डॉ. संगीता बर्वे प्राचीन रससिद्धांतावर आधारित भारतीय कला मानवी मनातील भावना व्यक्त करण्यासाठीच निर्माण झाल्या. याची अंतःप्रेरणा निसर्गानेच दिली आहे. रागसंगीतातील राग ही संकल्पना, समयचक्र तसेच कालचक्रावरही आधारित आहे. मनातील भाव रागातील सुरांमधून व्यक्त होतात. कालचक्राप्रमाणे ऋतू बदलतात. समयचक्राप्रमाणे सूर्योदय, सूर्यास्त सायंकाळ, रात्र होते तसेच मनाच्या अवस्था बदलत असतात. ते भाव रागाच्या माध्यमातून अभिव्यक्त करता येतात. ऋतुवाचक रागांमधून व्यक्त होणाऱ्या भावना किंवा विषय हे निसर्गसंगीतच असते असे म्हणता येईल. बसंत, बहार या रागांमध्ये असलेल्या सुरांतून तसेच या रागांमध्ये रचल्या गेलेल्या बंदिशींमधून जीवनाचे उमदे, आनंदी आणि आशादायी चित्र डोळ्यासमोर उभे राहते. आनंदी भावना व्यक्त होते. नवी पालवी, नवीन फुलांचं उमलणं, पशुपक्ष्यांचे गाणे, भ्रमरांचा गुंजारव अशा प्रकारचे वर्णन यात असते. आशादायी अंतःप्रेरणा आपल्याला नवीन येणाऱ्या काळाला सामोरं जाताना आवश्यकच असतात. राग बहारमधील ही पारंपरिक रचना अशीच नवी उमेद, नवी आशा अधोरेखित करते..... कलियन संग करता रंगरलिया। भँवर गुंजार फुली फुलवारी । चहूँ ओर मोर बोले । कोयल की कूक सुनी हूंक उठी।।
X