आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सचिन तेंडूलकरची विशेष मुलाखत : वनडेत २ नवीन चेंडूच्या प्रयोगामुळे रिव्हर्स स्विंग संपली; मोठ्या धावसंख्येचे सामने पाहायला मिळत आहेत - सचिन

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - इंग्लंडमध्ये २० वर्षांनी पुन्हा विश्वचषक होत आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी टीम इंडिया बुधवारी रवाना झाली आहे. सचिन तेंडुलकरने म्हटले की, गेल्या २० वर्षांत येथील परिस्थितीत मोठा बदल झाला आहे. नियमातदेखील बदल झाल्याने गोलंदाजांवर दबाव वाढला. पहिल्या वनडेच्या एका डावात एकच चेंडू वापरला जात होता. त्यामुळे २८-३० षटकानंतर गोलंदाजांना रिव्हर्स स्विंग मिळत होते. २०१२ पासून एका डावात दोन्ही बाजूने वेगवेगळा चेंडू वापरण्यास सुरुवात झाली. त्यामुळे रिव्हर्स स्विंग संपली व आपल्याला मोठ्या धावसंख्येचे सामने पाहायला मिळत आहेत. स्पर्धेपूर्वी सचिन तेंडुलकरशी विश्वचषक आणि भारतीय टीमच्या तयारीवर ‘दिव्य मराठी’शी झालेला संवाद ....
 

१९९९ नंतर पुन्हा इंग्लंडमध्ये विश्वचषक होत आहे, तेथे खेळण्याची परिस्थिती व खेळात कोणत्या प्रकारचा बदल झाला?
> १९९९ विश्वचषकाच्या वेळी नियम आणि चेंडू वेगवेगळे हाेते. १९९९ ची स्पर्धा कुकाबुरा आणि सध्याचा विश्वचषक ड्यूक बॉलशी खेळवली जात आहे. त्यासह येथील खेळपट्टीमध्ये खूप बदल झाला आहे. पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात नुकत्याच झालेल्या चार सामन्यांच्या मालिकेतील प्रत्येक सामन्यात ३५० पेक्षा अधिक धावा झाल्या आहेत. दुसऱ्या टीमने ते लक्ष्य गाठलेदेखील. म्हणजे प्रत्येकी सामन्यात ७ च्या सरासरीने धावा बनल्या. वनडेत आता गोलंदाजी कठीण आहे. डिसेंबर २०१२ मध्ये वनडेच्या प्रत्येकी डावात दोन नव्या चेंडूंचा वापर सुरू झाला. त्यामुळे रिव्हर्स स्विंग संपले.
 

२०११ विश्वचषकात जी तुमची भूमिका होती आणि सध्याच्या टीममध्ये जी धोनीची भूमिका आहे यात समानता आहे? अशात धोनीची भूमिका कशी पाहता? 
> धोनी सामन्यादरम्यान यष्टीच्या मागे असतो. त्याला सर्व क्षेत्ररक्षण व चेंडू दिसतो. तो फलंदाजांप्रमाणे खेळपट्टी पाहू शकतो. तो त्याबाबत कर्णधार व गोलंदजांना सांगू शकतो. त्यामुळे स्पर्धेत धोनीची भूमिका महत्त्वाची बनते.

 

> कोणाला नंबर चारसाठी योग्य मानता? कोहलीने गेल्या दोन वर्षांत येथे अनेक खेळाडूंना खेळवले. सध्या टीममध्ये ४ अष्टपैलूच्या जागी काेणता अतिरिक्त फलंदाज टीममध्ये ठेवला जाऊ शकतो? 
नंबर चारविषयी सध्या खूप चर्चा सुरू आहे. गेल्या काही वर्षांत टीम इंडियाने या क्रमांकावर अनेक बदल केले आहेत. दुसरीकडे त्याचा निकाल देखील सकारात्मक दिसून आला आहे. आपल्या टीम इंडियामध्ये अनेक फलंदाज आहेत, जे कोणत्याही क्रमांकावर स्वत:ला सिद्ध करू शकतात.  त्यामुळे ही आपल्यासाठी मोठी समस्या राहिलेली नाही.


विश्वचषकात उपांत्य फेरीतील चार टीम कोणत्या, कोणती टीम चॅम्पियन बनू शकते? 
> भारतासह इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड किंवा दक्षिण आफ्रिका या टीम उपांत्य फेरीत पोहोचू शकतात. त्यानंतर बाद फेरीमध्ये चांगले प्रदर्शन करणारी टीम पुढे जाईल आणि विजेता बनेल. हे परिस्थिती आणि खेळ करण्यावर निर्भर आहे.


तुम्ही सहा विश्वचषक खेळले, यंदाचा विश्वचषक किती वेगळा आहे. १९९२ पासून आतापर्यंत खेळाडूंमध्ये मानसिकता, तंदुरुस्ती व तंत्रात कसा फरक पडला?
> सतत खेळामध्ये बदल होत आहेत. २७ वर्षांत खेळात खूप बदल झाला. खेळाडूंचा आहार, फिटनेस व तयारीदेखील. आजदेखील सर्व टीमकडे इतर सर्व टीमची माहिती असते. संघासह मोठी सपोर्ट टीमदेखील राहते. खेळाडूंची मानसिकतादेखील बदलली असून आता मोठे लक्ष्यदेखील गाठले जात आहे.

 

विराटशी तुमची अखेरची भेट कधी झाली व काय चर्चा झाली?
> आयपीएल २०१९ दरम्यान विराट सोबत माझी भेट झाली. तेव्हा विश्वचषकाबाबत  आमच्यात काही चर्चा झाली नाही. मैत्रीपूर्ण गप्पा झाल्या. 
 

आयपीएलमुळे आपल्या खेळाडूंना फायदा झाला की नुकसान? काही तज्ञाच्या मते, यामुळे खेळाडूंचा ताण वाढला. काही म्हणतात, विश्वचषकाची तयारी झाली...
>आयपीएलमध्ये खेळाडूंना जगातील वेगवेगळ्या खेळाडूंबरोबर खेळायला मिळते. प्रत्येक खेळाडूला आपल्या शरीराबद्दल माहिती आहे. शरीराबरोबरच मानसिक विश्रांती गरजेची आहे. आयपीएलमुळे कोणतीही अडचणी नाही. आज जगात टी-२०, वनडे, कसोटीसह अनेक लीग खेळवल्या जात आहेत. विश्वचषकासाठी खेळाडूंची मानसिक व शारीरिक तयारी करून घेतली पाहिजे. प्रत्येक सामन्यानंतर कमीत कमी पाच दिवसांचे अंतर असावे. खेळाडूंना त्याचा निश्चित फायदा होईल.

 

भारताचे या मैदानावर झालेले जय-परायज

> ब्रिस्टल : भारताने ३ सामने खेळले, सर्व जिंकले.
> बर्मिंघम : भारताने १० सामने खेळले, ७ विजय व ३ पराभव.
> साऊथम्प्टन : भारताने ३ सामने खेळले, एक विजय व २ पराभव.
> नॉटिंघम : भारताने ६ सामने खेळले, ३ विजय व ३ पराभव.
> चेस्टर : टीम इंडियाने २ सामने खेळले, दोन्ही अनिर्णीत.
> कार्डिफ : भारताने चार सामने खेळले, ३ विजय व एक पराभव.
> लीड्स : भारताने ९ सामने खेळले, ३ विजय व ६ पराभव.
> लॉर्ड््स : भारताने ८ सामने खेळले, ४ विजय व ३ पराभव, १ ड्रॉ.
> ओव्हल : भारताने १५ सामने खेळले, ५ विजय, ९ पराभव, एक अनिर्णीत
> टांटन : भारताने एक सामना खेळला व जिंकला.
> ओल्ड ट्रॅफर्ड : भारताने ८ सामने खेळले, ३ विजय व ५ पराभव.

बातम्या आणखी आहेत...