महिला खेळाडूंच्या तीन / महिला खेळाडूंच्या तीन सर्वात मोठ्या अकादमींतून 'दिव्य मराठी'चा वृत्तांत

दिव्य मराठी नेटवर्क

Jan 26,2019 11:09:00 AM IST

दिव्य मराठी स्पेशल : माझी २१ मुले आहेत. त्यात २० मुली अकादमीत आहेत व १ माझा मुलगा. माझा उद्देश ऑलिम्पिकमध्ये देशासाठी पदक जिंकणे... पीटी उषा

पीटी उषाने फक्त मुलींसाठी अकादमी सुरू केली
> १८ वर्षांत ६७ आंतरराष्ट्रीय, ४५९९ राष्ट्रीय पदके जिंकली

भारतात गुणवत्तेची कमतरता नाही हे अॅथलेटिक्समधील अनेक वर्षांच्या अनुभवानंतर मी सांगू शकते. फक्त गरज पायाभूत, आधुनिक व वैज्ञानिक सुविधांची. जर आम्ही आपल्या युवा खेळाडूंना त्यांच्या गुणवत्तेप्रमाणे प्रशिक्षण देऊ शकलो तर ऑलिम्पिक पदक मिळवणे अवघड नाही, असे पी.टी.उषा यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, मला ४०० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत थोडे एक्सपोजर मिळाले असते तर लॉस एंजलिस ऑलिम्पिकमध्ये भारताला पदक मिळले असते. जर आमच्या देशाने वेगळ्या, व्यवस्थित, वैज्ञानिक पद्धतीने काम केले तर आमच्याकडे चांगले अॅथलिट्स तयार होतील. या विचारामुळे मी अकादमी सुरू केली. २००० ते २०१८ दरम्यान अकादमीच्या मुलींनी ६७ आंतरराष्ट्रीय, तर ४५९ राष्ट्रीय स्तरावरील पदके पटकावली. अकादमीत असणाऱ्या बहुतांश मुलींचे आई-वडील भाजी विक्रेते, घरातील नोकर, चालक किंवा खूप गरीब आहेत. प्रत्येक वर्षी फेब्रुवारीत ४०० ते ५०० मुले प्रवेशासाठी येतात. त्यातील फक्त ४ ते ५ मुलांची निवड होते. या मुलांना येथे मोफत जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळते.

पुढील स्लाइडर वाचा- मेरी कोम अकादमीत ९० % मुले गरीब परिवारातीलमेरी कोम अकादमीत ९० % मुले गरीब परिवारातील > अकादमीत अर्धी मुले ड्रॉपआऊट, बॉक्सिंगबरोबर अभ्यास करताहेत मणिपूरमधील नेनगनेई काही महिन्यांची असताना तिचे आई-वडिलांचे छत्र हरपले. त्यानंतर ती एका नातेवाइकांकडे राहण्यासाठी आली. मात्र, काही काळानंतर हे छत्रही हरपले. त्यानंतर मेरी कोमला नेनगनेईसंदर्भात माहिती मिळाली. त्या तिला अकादमीत घेऊन आल्या. या पद्धतीने नेनगनेई मेरी कोमच्या पहिल्या बॅचमध्ये सहभागी झाली. आज ती २३ वर्षांची आहे. आता ती स्वत:च्या पायावर उभी असून बॉक्सिंगमध्येे नाव कमावत आहे. मेरी कोम अकादमीत अशीच अनेक मुले, मुली आहेत. अकादमीतील मुलांमध्ये ५० टक्के ड्रॉप आउट आहे. आता त्यांना पदक जिंकण्याच्या प्रशिक्षणाबरोबर शिक्षणही दिले जात आहे. त्यांची शाळा अकादमीतच होत आहे. मेरी कोम म्हणतात, माझ्याकडे येणारी ९० टक्के मुले गरीब परिवारातील आहेत. ते शाळेचे शुल्कसुद्धा भरू शकत नाही. मेरी कोम एकेदिवशी पतीशी निवृत्तीसंदर्भात चर्चा करत होती. तेव्हा अकादमी सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी ज्या अडचणी आल्या त्यावर मात करत गेेली. आता जी अकादमी सुरू झाली ती जागतिक दर्जाची आहे. येथे प्रशिक्षणासाठी कोणालाही पैसे लागत नाहीत. अकादमीत प्रवेशासाठी दरवर्षी वृत्तपत्रात जाहिरात दिली जाते. ११ ते १५ वयोगटातील २०० मुलांना बोलावले जाते. त्यातील २० ते २५ मुलांची निवड होते.

देशासाठी पदक जिंकणारे १००० वेटलिफ्टर्स बनवणार > मल्लेश्वरीने हरियाणात जाऊन उघडली अकादमी २००० सिडनी ऑलिम्पिकमध्ये मल्लेश्वरीने भारोत्तोलनमध्ये (वेटलिफ्टिंग) कांस्यपदक जिंकून विक्रम केला. मुलांसाठी तिला अकादमी सुरू करायची होती. २००४ मध्ये अथेन्स ऑलिम्पिकनंतर त्यांनी त्या दिशेने काम सुरू केला. भारोत्तोलनामध्ये करिअर करणारे बहुतांश मुले गावातील असतात. त्यांची घरातील परिस्थिती साधारण असते. त्यांना प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्याच्या भूमिकेतून मल्लेश्वरीने हरियाणात अकादमी सुरू करण्याचा विचार केला. मल्लेश्वरी म्हणतात, गुणवत्तेत चीनसारख्या देशांपेक्षा आम्ही खूप पुढे आहोत. परंतु लक्ष केंद्रित केले नाही. हिमा दास हिने आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदक जिंकले, याचा आम्हाला आनंद आहे. परंतु पी.टी.उषानंतर पदक जिंकण्यासाठी आम्हाला ३० वर्षे का लागली? या ३० वर्षांत आम्ही ३० खेळाडूसुद्धा तयार करू शकलो नाही. माझे स्वप्न १००० वेटलिफ्टर्स तयार करण्याचे आहे, जे आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदक जिंकू शकतात. सध्या ८ ते १६ वर्षांची ५० मुले त्यांच्या अकादमीत प्रशिक्षण घेत आहेत. त्यात २६ मुली आहे. अकादमी आता तयार होत आहे. पूर्ण झाल्यावर मुलांची संख्या १०० पर्यंत वाढवण्यात येईल. > मलेश्वरीच्या अकादमीतील १६ वर्षीय मुस्कानने खेलो इंडियात सुवर्णपदक पटकावले. आता २०२८ मध्ये ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्याची जिद्द.
X
COMMENT