आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

२१ देशांत वेगवेगळ्या खेळांसाठी २६ वर्ल्ड कप; ३० मेपासून ४६ दिवसांचा क्रिकेट वर्ल्ड कप

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगात या वर्षी २६ वर्ल्ड कप किंवा वर्ल्ड चॅम्पियनशिप हाेणार अाहे. त्यात क्रिकेट, फुटबॉल, वेटलिफ्टिंग, बॉक्सिंग, अॅथलेटिक्स, टेबल टेनिस अाणि रोइंग टुर्नामेंट हे प्रमुख अाहेत.


अामच्यासाठी सर्वात प्रमुख क्रिकेट वर्ल्ड कप अाहे. प्रथमच वर्ल्ड कपमध्ये कसाेटी खेळणारे सर्व संघ नसतील. शूटिंगमध्ये मनू भाकर अाॅलिम्पिकसाठी पात्र ठरण्याची शक्यता अाहे.

 

दिनदर्शिका
}५ जानेवारी ते १ फेब्रुवारी : यूएईमध्ये एएफसी अाशिया कप. भारतासह २४ देशांचा सहभाग.
}२ ते २२ फेब्रुवारी : काेची व चेन्नईत प्रथमच प्रो व्हाॅलीबॉल लीग.
}१४ ते २१ मार्च : अबुधाबीत स्पेशल अाॅलिंपिक उन्हाळी खेळ
}२१ ते २८ एप्रिल: हंगेरीत वर्ल्ड टेबल टेनिस चॅम्पियनशिप. 
}२१ ते २४ एप्रिल: कतारमध्ये एशियन अॅथलेटिक्स स्पर्धा.  
}३० ते १४ जुलै: इंग्लंडमध्ये 


१२ वा क्रिकेट वर्ल्डकप. 
}५ ते ९ जून: पाेर्तुगालमध्ये नेशन्स लीग फुटबॉल फायनल्स.   
}७ जून ते ७ जुलै: फ्राॅन्समध्ये महिला फुटबॉल वर्ल्ड कप. 
}७ ते २१ सप्टेंबर: रशियामध्ये बॉक्सिंग (महिला, पुरुष) वर्ल्ड चॅम्पियनशिप.  
}16 ते २५ सप्टेंबर: थायलंडमध्ये वेटलिफ्टिंग वर्ल्ड चॅम्पियनशिप.
}२७ सप्टेंबर ते ६ अाॅक्टाेंबर: कतारमध्ये वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप. 

 

यंदा १० संघ
{क्रिकेट वर्ल्ड कप ३० मे १४ जुलैपर्यंत हाेणा अाहे.  इंग्लंडला पाचव्यांदा यजमानपद मिळाले अाहे. यावर्षी दहा संघ अाहेत. मागील दाेन वर्ल्ड कपमध्ये १४-१४ संघ हाेते.  प्रत्येक संघ ९ लीग मॅच खेळेल. ४६ दिवसांत एकूण ४८ सामने हाेतील.

 

शतकांचा विक्रम
{वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक २६  तर भारताने २५ शतके ठोकली अाहेत. मागील दाेन वर्ल्ड कपमध्ये भारताने १० तर ऑस्ट्रेलियाने ५ शतके ठाेकली अाहेत. भारत असाच खेळला तर शतकांमध्ये अाम्ही ऑस्ट्रेलियाला मागे टाकू. 

 

५० वा विजय मिळेल
{भारत ४ सामने जिंकले तर ५० सामने जिंकणारा दुसरा देश बनेल.  ऑस्ट्रेलिया ६२ सामने जिंकला अाहे.  भारताने अातापर्यंत ४९६ विकेट घेतल्या अाहेत. संघ ५०० विकेट  घेेण्याचा विक्रम करेल.  न्यूझीलंड (५२१), ऑस्ट्रेलिया (५१०), पाकिस्तान (५०६).

 

...हे प्रथमच
{कसाेटी खेळणारे सर्वच संघ प्रथमच वर्ल्डकपमध्ये सहभागी हाेणार नाहीत. कसाेटी खेळणारे देश झिम्बाब्वे व आयर्लंड यंदाच्या वर्ल्ड कपसाठी पात्र ठरले नाहीत. प्रथमच काेणता सहयाेगी संघ वर्ल्ड कपमध्ये सहभागी हाेत नाही. 

 

वर्ल्ड कप ट्रॉफीसाेबत ओमान महिला पुलिस

वर्ल्ड कप ट्रॉफीचा प्रवास अाॅगस्ट-२०१८ मध्ये दुबईतील आयसीसीच्या हेडक्वार्टरपासून सुरू झाला. ओमानमध्ये रॉयल ओमान पाेलिस हॉर्सवुमनसुद्धा ट्रॉफीच्या टूरमध्ये सहभागी झाल्या. त्यांनी ओमानच्या क्रीडामंत्र्यांना  ट्रॉफी दिली. ही ट्रॉफी ५ महाद्वीपांतील २१ देश व ६० शहरांमधून जाईल. हा अातापर्यंतचा सर्वात लांब जागतिक प्रवास अाहे. १९ फेब्रुवारीला इंग्लंडमध्ये प्रवास पूर्ण हाेईल. त्यानंतर १०० दिवस ब्रिटनमध्ये ट्राॅफी फिरेल. क्रिकेट न खेळणारे नेपाळ, अमेरिका व  जर्मनीत प्रथमच ट्राॅफी जाईल.

 

हे विजेते ठरू शकतात...
सेरेना २४ ग्रँड स्लॅमचा मार्गारेट कोर्टचा विक्रम माेडू शकेल


- सेरेना विल्यम्स, टेनिस
अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सने २३ ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकल्या अाहेत. ऑस्ट्रेलियाच्या मार्गारेट कोर्टच्या २४ ग्रँड स्लॅमचा विक्रमाच्या बराेबरी करण्याची तिला संधी अाहे. जर दाेन ग्रँड स्लॅम िजंकले तर विक्रम तिच्या नावावर हाेईल.

 

- पीव्ही सिंधू, बॅडमिंटन 
मागील वर्षी पीव्ही सिंधू वर्ल्ड टूर फायनल्समध्ये विजेतेपद मिळवणारी पहिली भारतीय खेळाडू हाेती. २०१९ मध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकू शकते. तिने २०१६ च्या अाॅलिंपिकमध्ये रजत पदक मिळवले 


- एमसी मेरी कोम, बॉक्सिंग
मेरी कोम सहा वेळा वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकणारी जगातील पहिली महिला बॉक्सर अाहे. या वर्षी विजेतेपद मिळाल्यास सर्वात जास्त सुवर्णपदक जिंकण्याचा ओव्हरऑल रेकॉर्ड (पुरुष-महिला) ची ती बराेबरी करेल. 

 

- विराट कोहली, क्रिकेट 
विराट कोहलीने २०१८ मध्ये ११ शतके ठाेकली हाेती. जर या वर्षी ९ शतके केली तर सर्वात जास्त शतके करणारा दुसरा खेळाडू बनेल. त्याची ७२ शतके हाेतील. सचिनची शंभर शतके अाहेत. 

 

- मनू भाकर, शूटिंग 
१७ वर्षीय मनू भाकरने २०१८ मध्ये वर्ल्ड कपमध्ये दोन, कॉमनवेल्थमध्ये एक, यूथ अाॅलिंपिकमध्ये एक गोल्ड मेडल जिंकले अाहे. अाता फेब्रुवारीत हाेणाऱ्या वर्ल्ड कपमध्ये सुवर्ण तसेच अाॅलिंपिक स्पर्धेसाठी पात्र ठरू शकते.

 

- लुईस हॅमिल्टन, फॉर्म्युला-१
ब्रिटनची फॉर्म्युला-१ रेसर लुईस हॅमिल्टन ५ वेळा एफ-१ वर्ल्ड चॅम्पियन झाली अाहेे. या वर्षी ती चॅम्पियन झाली तर सर्वाधिक चॅम्पियन हाेणारी दुसरी खेळाडू हाेईल.  मायकल शूमाकरकडे ७ विजेतेपद अाहेत.

 

हे मैदान साेडू शकतात
- महेंद्रसिंह धोनी, क्रिकेट

महेंद्रसिंह धोनी वर्ल्ड कपनंतर क्रिकेटमधून निवृत्त हाेऊ शकताे. धोनी कसाेटी संघातून २०१४मध्येच निवृत्त झाला अाहे. इंग्लडमध्ये हाेणारा वर्ल्ड कप त्याचा शेवटचा वर्ल्ड कप हाेऊ शकताे. त्याने भारताला २००७ टी-२०,  २०११ मधील एकदिवसीय  वर्ल्ड कपमध्ये विजेतेपद मिळवून दिले हाेते. 

 

- लिन डॅन, बॅडमिंटन 
चीनमधील लिन डॅन दोन अाॅलिंपिकमध्ये सुवर्ण, ५  वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये विजेत ठरला अाहे. ताे निवृत्त हाेऊ शकताे.

 

- एसवावरिंका, टेनिस 
स्वित्झर्लंडचा स्टान्सिलास वावरिंकाने ३ ग्रँड स्लॅममध्ये विजेतेपद मिळवले. दुखापतीमुळे ताे निवृत्ती घेऊ शकताे. 

 

हे प्रथमच हाेणार
महिलांसाठी फॉर्म्युला-१ सिरीज, बक्षिसांची रक्कम ११ काेटी रुपये
फक्त महिला रेसरसाठी फॉर्म्युला-१ मोटरस्पोर्ट सिरीज लाँच हाेईल. त्यात १८ ते २० रेसर अाहेत. बक्षिसांची रक्कम ११ काेटी रुपये अाहे. महिला मोटरस्पोर्ट सिरीजच्या माध्यमातून  भविष्यातील फॉर्म्युला-१ रेसरचा शाेध घेतला जात अाहे.  

 

बास्केटबॉल : प्रथमच एनबीएचे सामने भारतात खेळवले जातील  
अमेरिका बास्केटबॉल लीग एनबीएचे सामने भारतात हाेतील. ही जगातील पहिली मेजर स्पोर्ट्स लीग अाहे, ज्याचे सामने भारतात हाेईल. इंडियाना पेसर्स व सेक्रामेंटो किंग्सचेे ४ व ५ अाॅक्टाेेबरला  २ सामने खेळले जातील. 

 

खेलो इंडिया स्पर्धेमध्ये प्रथमच देशातील सर्व विद्यापीठे खेळतील
खेलो इंडिया विद्यापीठस्तरीय स्पर्धा जानेवारीत दिल्लीत हाेत अाहे. ही स्पर्धा २०१८  पासून सुरू झाली. अाधी फक्त शाळेचे संघ स्पर्धेत सहभागी झाले हाेते. या वेळी देशातील सर्व विद्यापीठे प्रथमच खेळतील.त्यात १८ स्पर्धा हाेतील.

 

कॅनडात थ्री-डी आर्चरीची पहिली वर्ल्ड चॅम्पियनशिप हाेईल
अाॅगस्ट-सप्टेंबर महिन्यात थ्री-डी अार्चरी वर्ल्ड चॅम्पियनशिप कॅनडात हाेईल. त्यात जगातील १०० पेक्षा जास्त खेळाडू सहभागी हाेतील. हे कंपाउंड व रिकर्व्ह आर्चरीपेक्षा वेगळी असेल. विजेत्यांना बक्षिसांची रक्कम दिली जाईल.