आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशी चवदार तळ्यावरी हाक पाण्याच्या घोटासाठी...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मिनाज लाटकर   ग्रामीण भागातील महिलांना व्यक्त होण्याची हक्काची जागा म्हणजे जातं. महिलांच्या अभिव्यक्तीची हीच सशक्त जागा असते असेही बोलले जाते. सर्वसाधारण महिलांनी यातून सांस्कृतिक अभिव्यक्तीचे दर्शन घडवले. पण आंबेडकर अनुयायी महिलांनी मात्र आपल्या भीमरायाची थोरवी गाण्यासाठी ओव्यांची रचना केली. अस्पृश्यता निवारणासाठी बाबासाहेबांनी केलेल्या संघर्षाची गाथाच पुणे येथील कुसुम सोनवणे यांनी जात्यावरील ओव्यांमध्ये मांडल्या आहेत.

“आली आली आगीन गाडी ओरडली जंगलात 
रामजीचं भीम बाळ उभं चवदार तळ्यात 
आली आली आगीन गाडी डब्या डब्याने मेणबत्त्या
या बहिणी आमच्या साऱ्या चवदार तळ्याला गेल्या होत्या
बाई चवदार तळं, तळं जाऊया पाहायला गं 
अशी भिमाई रायाला याला पाठिंबा द्यायला 
अशी चवदार तळ्यावरी रंग देती चार बोटं गं
बाई रामजी च्या पुताचं याचं धैर्य कि
ती मोठं..!”


या ओव्यांतून महाडच्या चवदार तळ्याचा संघर्ष तर त्यांनी मांडलाच शिवाय मोठ्या प्रमाणात महिलांचाही सहभाग होता. याचीही त्या आठ‌वण करून देतात


“अशी चवदार तळ्यावरी हाक पाण्याच्या घोटासाठी
जमली ती मैफिल इथं बाया पोरासाठी
असा चवदार तळ्यावरी आहे फुलांचा तो बाग गं
असा भीमरायांनी केला सत्याग्रहाचा त्याग गं
असा महाडच्या तळ्यावरी पाण्याचा घोट तो रंगला गं
बाई भिमाई रायानी वर बांधला बंगला गं 
असा खाईला मार हात पाण्याचा हक्का साठी गं
बाई कर्मठ जात इथं बामनाच
ी मोठी..!”

समाजात जातीव्यवस्थेचा प्रश्न गंभीर आहे. नैसर्गिक संसाधनांपासून  आंबेडकर अनुयायांना वंचित ठेवले गेले. या भावनेला या ओव्यांतून शब्दबद्ध करण्यात आले आहे. 

“बाई झाला ना सत्याग्रह दगड गोटा चं खाऊनी
अशी आमच्या हक्का साठी पोरं पोटाशी घेउनी गं 
अशी आमच्या जीवनाची आम्ही आशाचं नाही केली
आमच्या भीम रायाला याला साथ चं आम्ही दिली 
अशी महाडच्या तळ्यासाठी आम्ही कदर नाही केली
बाया पोरांना संगतीला, संग भाकर नव्हती ओली 
गावा गावात जाऊइनी आम्ही मीटिंगा कश्या केल्या
पण आमचा भीमराया आमच्या संगती
ला आला..!”

या संघर्षातून जे काही यश मिळाले त्याची कदर आजच्या काळात ठेवली जात नाही, अशी खंत व्यक्त करत चवदार तळ्याच्या सत्याग्रहासाठी कशा पद्धतीने एकत्र जमलो, खाण्यासाठी भाकरी नव्हती तरी महाडला जायचे नियोजन केले आणि बाबासाहेबांना साथ दिली याची आठवण करून देतात.


“यात कर्मठ जातीनी यांनी केलाना दगड फेक
भीमरायाच्या जोरावरी आमचा मिळविला हाक 
बाई दिल्लीच्या तख्तावरी निळा झेंडा फडकला
बाई नेत्यामधी नेता भीमराया झळक
ला..!”

डॉ. बाबासाहेबांच्या संघर्षाला यश आले आणि शेवटी त्यांनी संविधान घडवले. त्यामुळे दिल्लीच्या तख्तावर निळा झेंडा फडकवला असा गौरव या ओवींमधून कुसुम सोनवणे हिने केला आहे.