आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कला क्षेत्रात भारतीय महिलांची भरीव कामगिरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माझ्या आईचे काम आणि तिची कलेप्रति आसक्ती मी लहानपणापासून पाहिली आहे. आज तिची  (किरण नाडर) गणना आंतरराष्ट्रीय कला समूहात भारतीय कला आणि संस्कृतीच्या समृद्ध इतिहासातील महत्त्वाच्या व्यक्तींमध्ये होते. तिने आर्ट कलेक्टर म्हणून सुरुवात केली. त्या वेळी तिला या कामाचे औपचारिक प्रशिक्षण मिळाले नव्हते. पण कला पारखण्याची दृष्टी तिच्याकडे होते. गेल्या काही वर्षांत तिने ४ हजारांहून अधिक कलाकृती गोळा केल्या असून ५३० भारतीय कलाकृती तिने आपल्या मायभूमीत परत आणल्या. भारतीय कलेच्या इतिहासाच्या दृष्टीने हे मोठे यश आहे. हळूहळू संग्रह वाढल्यावर तिने प्रदर्शन लावून या कलाकृती सार्वजनिक करायला सुरुवात केली. तिने स्वत:च्या मेहनतीने सुरू केलेल्या या प्रदर्शनाचे नाव ‘किरण नाडर म्युझियम ऑफ आर्ट (केएनएमए)’ ठेवले. भारतीय आधुनिक कलेला एक ओळख मिळवून देण्यात महिलांचे योगदान कमी लेखले जात असल्याने तिने हा उपक्रम हाती घेतला. कला जगातील चर्चांमध्ये महिला कलाकारच नसत. भारतातील महिला कलाकारांसाठी एक खास व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा तिचा उद्देश होता. आईमुळेच मला कला जगताचा बारकाईने अभ्यास करण्याची, ते समजून घेण्याची आणि या मंचावर काम करण्याची संधी मिळाली. 
भारतात महिला नेहमीच कलेशी निगडित होत्या. त्या कलेच्या प्रेरणास्रोत, संरक्षक, संग्राहक, कलात्मक अभिव्यक्तीच्या नव्या रूपांच्या रचयिता आणि आविष्कारक होत्या. आज तर कला इतिहास आणि समीक्षणातही महिलांचे भरीव योगदान आहे. त्यांची भूमिका इतिहासापासून कलेच्या रूपांचा विकास आणि समृद्धीशीही निगडित आहे. 


परिस्थितीनुसार किंवा सामाजिक संदर्भात कला ही केवळ पुरुषकेंद्रित होती, त्या काळात हे काम अधिक प्रभावी ठरले. त्या वेळी महिलांना कधीही मुख्य प्रवाहात सामील होण्याची संधी दिली नाही. असे असले तरी भारतीय समकालीन कलेने अनेक महिला कलाकारांचा उदय पाहिला. महिलांनी असंख्य अतुलनीय कामे केली. यात पर्यावरणाला धोका, सामाजिक अन्याय, शहरांमधील महिला सुरक्षा आणि अस्तित्वाला धोका यांसारख्या व्यापक विषयांचाही समावेश आहे. आजही एखाद्या महिलेने कला विषयात करिअर करण्याचा निर्णय घेणे धाडसाचे ठरते.  १९२० किंवा १९३० च्या दशकात हा निर्णय घेण्यासाठी खंबीर व्यक्तिमत्त्व, दृढ निश्चयाची गरज होती. प्रसंगी बंडखोरी करावी लागत होती. त्या वेळी ही सामाजिक बंधने तोडण्याची गरज भासली नसती तर कदाचित आजही महिला देवी किंवा मातेच्या काळ्या-पांढऱ्या आकृत्यांमध्ये स्वत:चे प्रतिबिंब शोधत राहिली असती. 


अनेक शतकांपासून पुरुषांचे वर्चस्व असलेली ही परंपरा सर्वप्रथम अमृता शेरगिलने मोडीत काढली. शेरगिलच्या चित्रांमध्ये सर्वप्रथम भारतीय स्त्रीचे खरे दर्शन झाले. त्यांना २० व्या शतकातील सुरुवातीच्या कला क्षेत्रात अवंत ग्रेड महिला कलाकार आणि आधुनिक भारतीय कलेचे मार्गदर्शक मानले जाते. आज भारतीय कलाकारांनी साकारलेल्या मौल्यवान कलाकृतींमध्ये शेरगिल यांच्या चित्रांचा समावेश होतो. पण जिवंतपणी त्यांच्या कलेला योग्य प्रोत्साहन मिळाले नाही. २० व्या शतकाच्या सुरुवातीला या क्षेत्रातील प्रमुख महिला अमृता शेरगिल यांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या निमित्ताने आम्ही नुकतेच एक प्रदर्शन आयोजित केले होते. केवळ १४ वर्षे वयात अमृता शेरगिल यांनी आपले विचार आणि काव्य प्रतिभेवर प्रभुत्व मिळवत पेन्सिलने सेल्फ पोर्ट्रेटची एक मालिका केली. २८ व्या वर्षी त्यांच्या अकाली निधनाने कला जगतात मोठी पोकळी निर्माण झाली. पण त्यांनी आपल्या चित्रांच्या माध्यमातून महिला कलाकारांच्या एका पिढीलाच दिशा दाखवण्याचे काम केले. 


अमृता शेरगिलकडून प्रेरणा घेत नसरीन मोहंमदी, नलिनी मालिनी आणि अर्पिता सिंहसह अनेक महिला कलाकारांनी स्वत:चे विचार कलेच्या माध्यमातून समाजासमोर ठेवण्याचे धाडस केले. अर्थात पुरुष कलाकारांच्या तुलनेत या महिलांच्या कलेला कमी मूल्य दिले गेले. प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट ग्रुप-१८९० सारख्या महत्त्वाच्या प्रदर्शन आणि समूहांतून त्यांना बाहेर ठेवले गेले. आज या कलाकारांनी लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. गंभीर आणि विसंगत कलात्मक प्रथा उघडकीस आणणाऱ्या त्यांच्या कामामुळे आधुनिक भारतीय कलेचे परिदृश्य नव्याने परिभाषित करण्यात आले. या महिला कलाकारांना आणखी योग्य मंच उपलब्ध करून देण्यासाठी केएनएमएने रेट्रोस्पेक्टिव्हजचे आयोजन केले असून याकडे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जगाचे लक्ष वेधले आहे. या उल्लेखनीय महिलांनी आपली कला केवळ या क्षेत्रासाठी नव्हे, तर स्वत:मध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी, प्रतिकारासाठी आणि असंख्य मूक कथा उजेडात आणण्यासाठी आजमावली आहे.


नसरीन मोहम्मदीचे २०१६ मधील मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट ब्रेउर, न्यूयॉर्क व २०१५ मधील रीना सोफिया म्युझियम व नलिनी मालिनी यांच्या नुकत्याच पॅरीस येथे झालेल्या भारतीय कलेवरील प्रदर्शनात केएनएमएचे मोठे योगदान आहे. भारती खेर, शेबा छछी, नवजोत अल्ताफ, मिठू सेन, शिलो शिव सुलेमान आणि सोनिया खुराना यासारख्या तरुण पिढीतील महिला कलाकारही भारत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शन व लिलाव क्षेत्रात स्वत:ची ओळख निर्माण करत आहेत. कलेप्रती त्यांची निष्ठा आणि प्रेरणा भारतीय समकालीन कला अधिक समृद्ध करणारी आहे. 

बातम्या आणखी आहेत...