आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१०% जीडीपीने बेराेजगारीवर मात

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राेजगारविषयक अनेकविध अहवालांनी अखेर भारतात बेराेजगारीचे संकट अधिक गडद हाेत असल्याच्या मुद्द्यावर शिक्कामाेर्तब केले. उल्लेखनीय म्हणजे शहरी आणि सुशिक्षित युवकांची स्थिती सर्वाधिक वाईट आहे. अर्थात, जाॅब मार्केटच्या दृष्टीने या दाेन्ही बाबी फायद्याच्या ठरतात. राेजगार संधींविषयी यापूर्वी पुरेशी चर्चा झाली आहे. आता हा प्रश्न साेडवण्यासाठी उपाय शाेधण्याची वेळ आहे. आराेप-प्रत्याराेपांच्या राजकीय खेळीत मूलभूत राष्ट्रीय मुद्द्याकडे दुर्लक्ष व्हायला नकाे.


बेराेजगारी निर्माण हाेण्याची अनेक कारणे आहेत. यामध्ये काही आमच्या चुका आणि काही जागतिक ट्रेंड सामील आहेत. तथापि, जर आम्ही या समस्येची साेडवणूक करू पाहू तर एकच बाब त्यावर मात करू शकते आणि ती म्हणजे अत्यधिक वृद्धिदर असलेली अर्थव्यवस्था. म्हणूनच जर भारतीय म्हणून हा प्रश्न साेडवण्याचा विचार करू तर आमच्यासमाेर सामूहिक उद्दिष्ट असले पाहिजे. थाेडक्यात, जीडीपी १० म्हणजे अर्थव्यवस्थेला १० टक्के गती देणे. आता आपण ७ टक्क्यांच्या आसपास आहाेत. १० टक्क्यांचे उद्दिष्ट आव्हानात्मक वाटत असले तरी अशक्य मुळीच नाही. अर्थव्यवस्था ‘यूपीए’मुळे विलक्षण वेगाने वाढली की ‘एनडीए’मुळे या मुद्द्याला फारसा अर्थ नाही. आता महत्त्व नव्या परिमाणांना आहे. १० टक्के जीडीपी वृद्धी हा आकडा तसा माेठा आहे. परंतु माेठ्या संख्येने सुशिक्षित शहरी बेराेजगारांना राेजगार संधी देण्यासाठी त्याची गरज आहे. हेदेखील तितकेच खरे की, हे उद्दिष्ट गाठल्याने केवळ बेराेजगारीचा प्रश्न संपुष्टात येईल, असेच नव्हे तर जीडीपी १० टक्क्वयांर पाेहाेचल्यामुळे अन्य बरेच सारे फायदे हाेतील. यामध्ये समृद्ध जीवनशैली, दरडाेई अधिक उत्पन्न, सरकारसाठी अधिक महसूल, ज्याचा वापर अनेक कल्याणकारी याेजनांसाठी हाेऊ शकेल. बचत आणि गुंतवणुकीत वाढ हाेईल. प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुकीला देशात अधिक वाव मिळेल, जागतिक व्यासपीठावर भारताचा प्रभाव वाढेल. मग ती चर्चा परराष्ट्र मंत्रालयाशी निगडित असेल किंवा व्यापारविषयक. अर्थातच तीन विशिष्ट, निश्चित आणि करण्यायाेग्य अशा पद्धती आहेत, ज्यामुळे जीडीपी अधिक वेगाने वाढेल.


१. कृषी उत्पादनाच्या मूल्यवृद्धीसाठी कृषीआधारित व्यापक गुंतवणूक : आपल्या अर्थव्यवस्थेचा पायाभूत घटक म्हणजे शेती. भारतात माेठ्या प्रमाणावर कच्चा माल उपलब्ध असताे. मात्र त्याच्या मूल्यवृद्धीसाठी ठाेस प्रयत्न हाेत नाहीत. द्राक्षांपासून बनणारी वाइन, द्राक्षांच्या तुलनेत बरीच महाग विकली जाते. याचप्रमाणे दुधाएेवजी चांगल्या प्रतीचे चीझ बऱ्यापैकी जादा दर मिळवून देऊ शकते. स्वीडनमधील चीझ जगभरात सर्वश्रेष्ठ का मानले जाते, याचाही विचार झाला पाहिजे. पाश्चिमात्य राष्ट्रांप्रमाणे आपण लढाऊ विमान किंवा टेलिकाॅम उपकरणे बनवू शकत नाही, हे समजू शकताे. परंतु सर्वाेत्तम चीझ किंवा जॅम का बनवू शकत नाही? किंवा अन्य सेंद्रिय सुपरफूड्स का बनवू शकत नाही, ज्यामुळे जगभरात क्रांती निर्माण झाली आहे. एका उत्कृष्ट कृषीआधारित उद्याेगाला चांगली गुणवत्ता, जागतिक दर्जाचे पॅकिंग आणि याेग्य पद्धतीच्या विपणनाची गरज असते. आपण या देशात साेने उगवताे; परंतु, त्यास झळाळी, चमक देऊन कसे विकावे हे काैशल्य ज्ञात नाही. जीडीपी विकासावर याचा परिणाम १ ते २ टक्के हाेऊ शकताे.


२. आपले सिंगापूर आणि हाँगकाँग बनवा : हाँगकाँग हे खऱ्या अर्थाने भांडवलवादी शहर आहे, येथे उद्याेगासाठी पाेषक कायदे आहेत. ताे चीनचा घटक आहे, मात्र त्रासदायक नियम लागू हाेत नाहीत. वित्तीय, व्यापारी आणि बिझनेस हबच्या माध्यमातून चिनी अर्थव्यवस्थेत अत्याधिक याेगदान देते. मात्र भारतात असे एकही शहर नाही जे पूर्णपणे मुक्त आहे. सरकार आणि स्थानिक प्रशासन व्यवस्था उद्याेगांना गुदमरून टाकतात. संसदेत विशेष कायदा बनवून शहरांना स्वायत्तता दिली पाहिजे आणि कायद्यांना स्थैर्य मिळाले पाहिजे. बंदरांवर पायाभूत सुविधा असल्या पाहिजेत. याचा जीडीपीवर १ ते २ टक्के प्रभाव पडताे.


३. सर्वाेत्तम विमानसेवा आणि एअरपाेर्ट हब : या प्रकल्पामुळे केवळ माेठ्या प्रमाणावर राेजगार निर्माण हाेतील असेच नव्हे, तर जगभरातील व्यापारउदीम भारतातून चालेल. व्यापार, पर्यटन आणि जगाशी आपण जाेडले जाऊ. परिणामी १-२ टक्के जीडीपी वाढेल. भूतकाळाच्या तुलनेत भविष्यातील नाेकऱ्यांमध्ये काैशल्य विकास अधिक वेगळा असेल. आपल्या शिक्षणव्यवस्थेलाही नवे रूप द्यावे लागेल. नाेकऱ्यांच्या संधी लक्षात घेऊन त्या पद्धतीचे काेर्स सुरू करावे लागतील. २० वर्षांनंतर जाॅब मार्केट कसे असेल याचा अंदाज काेणी बांधू शकणार नाही. या मार्केटवर कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या तंत्रज्ञानाचा प्रभाव असेल. अर्थातच या परिवर्तनाला प्रदीर्घ काळ लागणार आहे. जर तुम्ही व्यक्तिगत पातळीवर नाेकरीच्या संकटाचा सामना करीत असाल तर तत्काळ काही उपाय याेजू शकता...


१. नेटवर्किंग शिका : स्वत:चेे मार्केटिंग करायला शिका. जर तुम्हाला जाॅब हवा असेल तर अशा लाेकांच्या भेटीगाठी घ्या. शक्य तितक्या अधिकाधिक लाेकांना व्यक्तिश: भेटा. नव्या तंत्रज्ञानाचा वापर करा. आपला फाेन केवळ व्हिडिआे पाहणे, मित्रांना गप्पा मारण्यासाठी नाही, संपर्क वाढवण्यासाठी त्याचा वापर करा, जे तुम्हाला नाेकरी देऊ शकतील.


२. विवाह साेहळ्यावरील खर्च टाळा : विवाह साेहळा कितीही अद्भुत असाे, लाेक ताे विसरून जातात, किंवा आपल्या नातेवाइकांत ईर्षा वाढीस लावताे. त्याएेवजी पैशाचा विनियाेग नव्या स्टार्टअपमधील गुंतवणुकीवर केेला पाहिजे. जगभरातील जाॅब मार्केट बदलत आहे, आणि भारत त्यास अपवाद नाही. नाेकऱ्यांच्या संकटाचा मुकाबला करायचा तर त्यास स्वत:चा जाॅब बनवा.

बातम्या आणखी आहेत...