आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकाेणत्याही कलाकाराला विशेषत: नायकाला आपल्या करिअरमध्ये एक तरी माइलस्टाेन चित्रपट हवा असताे. राजेश खन्ना, अमिताभ बच्चन किंवा अलीकडच्या काळातील आमिर खान, नवाजुद्दीन सिद्दिकी या कलाकारांच्या नावावरील अनेक माइलस्टाेन जरा बाजूला ठेवू. पण, पिळदार शरीर, हीराे फिगर, हँडसम लूक असलेल्या कलाकारांनाही आणि कायम राेमँटिक, फाइट असलेले, गुडी-गुडी चित्रपट मिळत जातात. पण, एखाद्या हीराेचा एखादा चित्रपट प्रचंड हिट ठरताे आणि त्याच्या करिअरसाठी ताे माइलस्टाेन ठरताे असं खूप कमी वेळा हाेतं.
सुभाष घईच्या ‘ताल’ चित्रपटात मार्ग माॅबमध्ये डान्स केलेल्या शाहिद कपूरने त्याच्या करिअरची सुरुवात खरं तर माॅडेलिंग आणि काही अल्बममधून केली. पुढे ‘इश्क-विश्क’ या पहिल्याच चित्रपटातील त्याच्या भूमिकेला फिल्म फेअर बेस्ट मेल डेब्यू पुरस्कारही मिळाला. तेव्हाच बाॅलीवूडला एक चांगला हीराे मिळाल्याची पावती अनेकांनी दिली.
मधल्या काळात शाहिदला पाहिजेे तसे माइलस्टाेन चित्रपट मिळाले नाहीत. त्याचे चित्रपट आले, ते गाजलेही, पण त्यात शाहिद कपूर गाजलाच असे झाले नाही. आता मात्र ताे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे ते म्हणजे ‘कबीर सिंग’ या चित्रपटातील भूमिकेमुळे अवघ्या दीड-दाेन आठवड्यांत शाहिदच्या या चित्रपटाने तब्बल २०० काेटींपेक्षा अधिक बिझनेस केला आहे. साउथचा चित्रपट ‘अर्जुन रेड्डी’चा हिंदी रिमेक असलेल्या ‘कबीर सिंग’ चित्रपटाचे रिव्ह्यू समीक्षकांकडून खूप उत्तम येत नसले तरी बाॅक्स आॅफिसवर मात्र हा चित्रपट कमाल करत आहे. त्याने आयुष्मान खुराणाच्या ‘आर्टिकल १५’ या चित्रपटाला कधीच मागे टाकलं आहे. विशेष म्हणजे सध्या वर्ल्डकप सुरू असतानाही यंगस्टर्सची चित्रपटाला हाेणारी गर्दी हा गल्ला भरण्यासाठी कारणीभूत ठरत आहे.
थाेड्याशा वेड्या किंवा डाेकं फिरलेल्या प्रियकराची भूमिका शाहिदने या चित्रपटात केली आहे. पण, ती ज्या काैशल्याने त्याने निभावली त्याचंच खरं तर खूप काैतुक हाेतं आहे. तरण आदर्श यांनी बुधवारी केलेल्या एका ट्विटनुसार कबीर सिंग लाइफटाइम बिझ आेलांडण्यासही सज्ज झाला आहे. हिंदीतील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांवर नजर टाकली तर कबीरसिंग दहाव्या नंबरवर आला आहे. त्याने उरीला मागे टाकलं आहे, आता उरी अकराव्या नंबरवर आला आहे.
या चित्रपटाने पहिल्याच दिवशी २०.२१ काेटी, दुसऱ्या दिवशी २२, तिसऱ्या दिवशी २७ ते तेराव्या दिवशी ९ काेटी असा दर दिवसाला सरासरीने १५ ते १७ कराेड रुपयांचा गल्ला कमावत आता त्याची कमाई जवळजवळ अडीचशे कराेडपर्यंत गेली आहे.
या चित्रपटात इतर अनेक कलाकार असूनही शाहिदच्या भूमिकेने पर्यायाने त्याच्या करिअरसाठी एक बुस्ट मिळाला आहे. ज्या बुस्टच्या प्रतीक्षेत प्रत्येक हीराे असताेच...!
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.