political / रविवारी मंत्रिमंडळ विस्तार? ; फडणवीस, उद्धव यांच्यात ‘मातोश्री’वर चर्चा, रात्री उशिरा टि्वट करून दिली माहिती

विधिमंडळाचे अधिवेशन सोमवारपासून.  मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी होईल, अशी चर्चा आहे. 

वृत्तसंस्था

Jun 15,2019 10:02:07 AM IST

मुंबई - प्रस्तावित राज्य मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी रात्री उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनीच रात्री उशिरा टि्वट करून ही माहिती दिली. फडणवीस यांनी टि्वट केले की, मी मातोश्री येथे जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत आम्ही विस्तृृत चर्चा या वेळी केली.


विशेष म्हणजे शुक्रवारी दुपारी विस्ताराबाबत विचारले असता उद्धव म्हणाले की, विस्तार केव्हा होणार आहे हे मला माहिती नाही. माझ्याकडे पंचांग नाही. सध्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांसह ३७ मंत्री आहेत. त्यात भाजपचे १६ कॅबिनेट आणि सात राज्यमंत्री आहेत. तर शिवसेनेचे पाच कॅबिनेट तर केवळ एक राज्यमंत्री आहे. इतर घटक पक्षांचा प्रत्येकी एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री आहे. विस्तारात आणखी पाच जणांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

रविवारी विस्तार?
विधिमंडळाचे अधिवेशन सोमवारपासून सुरू होणार आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी होईल, अशी चर्चा आहे.

X
COMMENT