आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Divyamarathi Interview Of Fincare Small Finance Bank Chief People Officer Pankaj Gulati

आर्टिफिशियल इंटेलिजन्ससारखे नवीन तंत्रज्ञान आल्याने मंदी असतानाही बँकिंग क्षेत्रात राेजगाराच्या अनेक संधी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - आयबीईएफच्या अहवालानुसार भारतात वर्ष २००७-१८ दरम्यान कर्जामध्ये १०.९४% आणि ठेवींमध्ये ११.६६ % दराने वाढ हाेत आहे. त्यामुळे बँकिंग क्षेत्रात राेजगाराच्या अनेक संधी तयार हाेत आहेत. एआयसारख्या तंत्रज्ञानानेही संधींची नवीन दारे खुली केली आहेत. क्षेत्रात नाेकऱ्यांच्या संधींबाबत फिनकेअर स्माॅल फायनान्स बँकेचे चीफ पीपल ऑफिसर पंकज गुलाटी यांच्याशी दिव्य मराठीने केलेली बातचीत..

> बँकिंग क्षेत्रात फ्रेश, अनुभवी व्यावसायिकांसाठी सध्याच्या स्थितीत काय संधी आहेत ?
बँकिंग सुविधा आता ग्रामीण भागापर्यंत पाेहोचत आहेत. त्यामुळे नवीन व अनुभवी व्यावसायिकांसाठी संधी वाढत आहेत. कर्ज क्षेत्रात सेल्स, क्रेडिट, कलेक्शन, ब्रँच आॅपरेशन्स, फील्ड आॅडिट, एचआर, ट्रेनिंग आदी प्रकारच्या नाेकऱ्या आहेत. डिपाॅझिटरीमध्ये सेल्स आणि आॅपरेशन्सशी संबंधित नाेकऱ्या आहेत.


> आपल्या बँकेत नाेकरीसाठी काेणत्या प्रकारच्या पात्रतेची गरज असते
?
ग्रामीण भागातील शाखांमध्ये फील्डवरच्या नाेकरीसाठी दहावीचे शिक्षण पूर्ण करणाऱ्या युवकांची निवड केली आहे. बिगर फील्ड कामासाठी बारावी तर काॅर्पाेरेट आॅफिस हायरिंगसाठी पदवीधर, पदव्युत्तर पात्रता असणे गरजेचे आहे.


> बँकांमध्ये  काेणत्या प्रकारच्या काैशल्याची गरज असत
े ?
आम्ही ग्रामीण आणि शहरी दाेन्ही बाजारपेठांत ग्राहकांना सेवा देणे व सर्व स्टेकहाेल्डरसाठी काम करताे. स्थानिक अर्थव्यवस्था, ग्राहककेंद्रित प्रक्रिया, तंत्रज्ञान आणि डिजिटल उपकरणांची हाताळणी करण्याचे काैशल्य गरजेचे आहे. वरिष्ठ पातळीवर प्राॅब्लेम साॅल्व्हिंग, माेठ्या प्रमाणावर डेटा कलेक्शन व विश्लेषण करण्याची क्षमता असण्याची गरज असते.

> मुलाखतीसाठी कशा प्रकारे तयारी करावी?
उमेदवाराचे शिक्षण व अनुभव जीवनातल्या परिस्थितीशी जाेडले पाहिजेत. ते तार्किक असावेत. त्यांच्याकडे समस्यांचा सामना करण्याची उदाहरणे व ती दूर करण्यासाठी केलेल्या उपाययाेजना असल्या पाहिजेत. त्याहीपेक्षा त्यांना परस्परातील संघर्षाची हाताळणी व दुसऱ्यांना सकारात्मक रीतीने प्रभावित करता आले पाहिजे.

> बँकांत काेणत्या भागात जास्त नाेकऱ्या आहेत?
कर्ज आणि ठेवी दाेन्हीत व्हर्टिकलमध्ये विक्री व ग्राहक सेवामध्ये जास्त नाेकऱ्यांच्या संधी आहेत.

> उमेदवार तुम्हाला कसे संपर्क करू शकतात ?
फ्रंटलाइन भूमिकांसाठी बँका नियमितरीत्या स्थानिक वृत्तपत्र, साेशल मीडिया आदींमध्ये जाहिराती देताे व वाॅकइन मुलाखती शिबिरे घेताे. निवडलेल्या उमेदवारांना प्राेव्हिजनल आॅफर दिली जाते. उमेदवार आपला प्राेफाइल careers@fincarebank.com यावर पाठवू शकतात.
 

वर्ष २०४० पर्यंत भारत बनणार जगातील तिसरे सर्वात माेठे बँकिंग हब
> खासगी बंॅकांचा सातत्याने विस्तार हाेत आहे. यात जवळपास १.५ लाख लाेकांना नाेकरी मिळण्याची शक्यता आहे. ८.५ लाखापेक्षा जास्त लाेक बंॅकिंग क्षेत्रात कार्यरत आहेत.
> रिझर्व्ह बंॅकेनुसार वर्ष २०१८ पर्यंत बंॅकिंग प्रणालीमध्ये सार्वजनिक क्षेत्रातल्या २१ बंॅका, खासगी क्षेत्रातील २१ बंॅका, ४९ विदेशी बंॅका, ५६ क्षेत्रीय ग्रामीण बंॅका, १,५६२ शहरी सहकारी बंॅका व ९४,३८४ ग्रामीण सहकारी बंॅका हाेत्या. 
> भारत चाैथी सर्वात माेठी रिटेल क्रेडिट बाजारपेठ आहे. ती २०१४ मधील १८१ अब्ज डाॅलरवरून वाढून २०१७ मध्ये २८१ अब्ज डाॅलरवर गेली 
> राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बंॅकेने२,०४,००० पीआेएस टर्मिनल स्वीकृत केले आहेत. 
> मे २०१८ मध्ये मायक्राे फायनान्स क्षेत्राचे एकूण इक्विटी फंडिंग ३९.८८ टक्के वाढले आहे. आता ते ९६.३१ अब्ज रुपये झाले आहे. 
> व्यावसायिक व सहकारी बंॅकांच्या ६७,००० पेक्षा जास्त शाखाकार्यरत आहेत. २०४० पर्यंत भारत तिसरे सर्वात माेठे बंॅकिंग हब हाेईल.