Jalgaon / DvM Talk Show: दिव्य मराठीच्या जळगाव कार्यालयात सपत्निक पोहोचले प्रसिद्ध जादुगार सुमीत छाजेड

दिव्य मराठीशी संवाद साधताना सुमीत छाजेड उलगडला जादुई दुनियेचा प्रवास

Sep 10,2019 06:50:51 PM IST

जळगाव - लहानपणापासून आपल्याला जादूचे मोठे आकर्षण असते. जादू ही लहान मुलांसह मोठ्यांनाही अचंबित करते. जादू करणे हे कठीण असले तरी ती करण्यासाठी कोणतीही शक्ती लागत नाही. जादू करण्यासाठी टेक्नॉलॉजी लागत असल्याचे जादूगर तथा सुमित छाजेड यांनी सांगितले. छाजेड यांनी जादूच्या माहितीसह प्रात्यक्षिक करून दाखवले. चष्मा जागेवरून हलवून दाखविणे, तोंडात टाकलेला मोती डोळ्यातून बाहेर काढणे, आपल्या मनातील राणी कार्डच्या साहाय्याने काढणे, एक्स-ओच्या सहाय्याने गणेशाची मूर्ती तयार करणे, हातात हात घेतल्यावर ते चोळून फुलांचा वास येणे यांसारख्या अनेक जादूई कला दाखवत त्यांनी कर्मचाऱ्यांचे मनोरंजन केले. त्यांच्या पत्नी कोमल छाजेड उपस्थित होत्या. त्या दोघांशी दिव्य मराठी जळगावचे निवासी संपादक त्र्यंबक कापडे आणि संपादकीय विभागातील इतर सहकाऱ्यांनी संवाद साधला.

X