आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चांदपुरींनी 120 जवानांच्या बळावर रात्रभर 2000 पाक सैनिकांना पिटाळले, सनी देओलने 'बॉर्डर'मध्ये केली होती त्यांची भूमिका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोहाली - १९७१ मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात नायक ठरलेले ब्रिगेडियर कुलदीपसिंग चांदपुरी यांचे ७८ व्या वर्षी कॅन्सरने निधन झाले. काही दिवसांपूर्वीच ते परदेशातून परतले होते. राजस्थानात लोंगोवालमध्ये त्यांनी निर्णायक लढाई लढली होती. चांदपुरी यांच्या नेतृत्वाखाली १२० जवानांनी २००० पाकिस्तानी सैनिकांना पिटाळून लावले, पाकचे १२ रणगाडे उद््ध्वस्त केले होते. १९९७ मध्ये निर्माता-दिग्दर्शक जे. पी. दत्ता यांनी पंजाब रेजिमेंटच्या या शौर्यावर 'बॉर्डर' चित्रपट काढला होता. यात चांदपुरी यांची भूमिका सनी देओलने बजावली होती. 


श्रद्धांजली |खऱ्या हीरोला पडद्याद्वारे लोकांच्या मनात स्थान देणारे जे.पी. दत्ता यांच्या लेखणीतून... 
 ब्रिगेडियर कुलदीपसिंग चांदपुरी यांच्याशी माझी भेट उशिरा झाली. मात्र, पूर्वीपासून मी त्यांचा चाहता होतो. माझे धाकटे बंधू हवाई दलात होते. ते लोंगोवाल लढाईतही सहभागी होते. त्यांच्याकडून मी या युद्धाविषयी आणि कुलदीपसिंग यांच्याबद्दल खूप ऐकले होते. काही वर्षांनंतर भटिंडामध्ये एका मिग विमान अपघातात माझ्या बंधूंचा मृत्यू झाला. म्हणून मला लष्कराबद्दल खूप आदर होता, आहे. 


१९७१च्या युद्धकाळात मी महाविद्यालयात होतो. तेव्हा मी या युद्धावर एक कथा लिहिली होती. विचार केला की यावरच एक चित्रपट काढावा. कॉलेज सुटले आणि मी दिग्दर्शक झालो. चित्रपट काढत राहिलो. मी निर्माता झालो तेव्हा याच विषयावर चित्रपट काढण्याचा विचार केला. याबाबत कुलदीपसिंगना भेटलो. आजही मला तो दिवस आठवतो. मी माझ्या हीरोला भेटत होतो. तगडी शरीरयष्टी, चेहऱ्यावर हास्य, मृदू भाष्य असे त्यांचे लोभस व्यक्तिमत्त्व होते. मग त्यांनी मला लोंगोवाल युद्धाबाबत सांगण्यास सुरुवात केली. ४ डिसेंबर १९७१ रोजी लोंगोवाल चौकीवर तैनात तत्कालीन मेजर कुलदीपसिंग यांना पाकिस्तानी सैनिक आगेकूच करत असल्याची माहिती मिळाली. तेव्हा चौकीवर केवळ १२० भारतीय जवान होते. सायंकाळ झाली होती. दुसरीकडून मदत मिळणे शक्य नव्हते. कुलदीपसिंग यांच्याकडे दोनच पर्याय होते. एक तर सैनिकांना घेऊन रामगडला जायचे (तसा आदेशही होता)किंवा या चौकीवर सुरक्षेसाठी सज्ज राहायचे. मात्र, कुलदीपसिंग यांनी दुसरा पर्याय निवडला. काही वेळातच पाकिस्तानी रणगाडे आग ओकू लागले. 
- शब्दांकन : संजय आवटे 


 जे. पी. दत्ता बॉर्डर चित्रपटाचे निर्माता-दिग्दर्शक 
लोंगोवालमध्ये रणगाड्यावर कुलदीपसिंग चांदपुरी. त्यांना महावीर चक्र व विशिष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात अाले. 

बातम्या आणखी आहेत...