आझाद हिंद सेनेत / आझाद हिंद सेनेत भरतीआधी नेताजी महिला जवानांना विचारायचे, शत्रूंवर गोळ्या झाडू शकशील? स्वत:ही गोळी खाऊ शकशील का?

दिव्य मराठी वेब टीम

Jan 23,2019 12:00:00 AM IST

भागलपूर (बिहार) - आज नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती आहे. 23 जानेवारी 1897 रोजी त्यांचा जन्म झाला होता. या निमित्ताने आम्ही तुम्हाला नेताजींविषयी काही खास गोष्टी सांगणार आहोत. 75 वर्षांपूर्वी 21 ऑक्टोबर 1943 ला नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेचे सेनापती म्हणून देशातील पहिले अस्थायी सरकार स्थापन केले होते. बिहारच्या भागलपूरच्या रहिवासी 86 वर्षांच्या भारती चौधरी आशा या आझाद हिंद सेनेच्या सदस्या होत्या. त्यांनी सरकारही पाहिले. नेताजींसोबतचे आपले अनुभव आणि प्रशिक्षण काळातील दिवस आजही भारतींना स्मरणात आहेत. त्यांच्याशी चर्चेचा हे प्रमुख अंश...


शेवटच्या वेळी नेताजींनी विचारले - भीती तर वाटत नाही ना; मी म्हणाले - नाही वाटत
देशासाठी लढण्याची वयाच्या 15 व्या वर्षापासूनच माझी इच्छा होती. 1943 मध्ये सुभाषचंद्र बोस टोकियोला आले. आई मला व बहिणीला घेऊन त्यांना भेटायला गेली. नेताजींना ती म्हणाली, माझ्या कन्येलाही तुमच्या सैन्यात भरती करून घ्या. नेताजींनी मला विचारले, देशाच्या शत्रूंवर गोळ्या झाडू शकशील? देशासाठी गोळी खाऊ शकशील? मी उत्तरले - हाे, नक्कीच.. ते म्हणाले, अजून तू लहान आहेस, नंतर सैन्यात घेऊ. वर्षभराने नेताजी पुन्हा जपानला आले. मी त्यांना भेटायला गेले. यावेळी त्यांनी मला भरती करून घेतले.

रेजिमेंटमध्ये भरती होताच माझे लष्करी प्रशिक्षण सुरू झाले. तेथे उजेडाची व्यवस्था नसायची. आगपेटीही लावायची मुभा नव्हती. उजेडामुळे आम्ही शत्रूंना दिसलो असतो. महिनाभर फक्त भातच खावा लागला.


फक्त एकच जिद्द होती - देशाला स्वातंत्र्य मिळवून देणे. राणी लक्ष्मीबाई रेजिमेंटचे नर्सिंग व फायटिंग असे दोन भाग होते. मी फायटिंगचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर युद्धमोहिमेवर गेले. वरून बॉम्बूवर्षाव होत होता. शत्रूंच्या बंदुकांतून गोळ्या सुटत होत्या. मात्र आम्ही आनंदी होतो. देशासाठी वीरमरण हे आमच्या 300 सहकाऱ्यांचे स्वप्नच होते. लवकरच उमगले की आझाद हिंद सेना सध्या जिंकू शकत नाही. नेताजींनी सर्व मुलींना त्यांच्या घरी पाठवण्याचा निर्णय घेतला. ते आम्हाला भेटायला घरी आले व भावुक झाले. बंगालीत म्हणाले, तुमी भया बोधा नका (तुला भीती तर वाटत नाही ना?) मी उत्तरले - आमी भय पाच्छी (मी नाही घाबरत) त्यांनी माझ्या मस्तकावर हात ठेवला. हीच आमची शेवटची भेट ठरली. महिनाभराने बातमी आली की त्यांचे विमान अपघातग्रस्त झाले आहे. - भारती

X
COMMENT