आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्यांग गिर्यारोकाकडून माउंटन कोसीअस्झको सर

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

प्रवीण देशपांडे 

परभणी - एका अपघातात डावा पाय व डावा हात गमवावा लागल्यानंतरही जिद्द, चिकाटी, मेहनत व साहसाच्या बळावर हैदराबादच्या शेखर गौडने ऑस्ट्रेलियातील सर्वात उंच शिखर माउंटन कोसीअस्झको हे सोमवारी (दि. २) सकाळी सर केले. त्याच्या या जिद्दीला येथील ज्ञानसाधना प्रतिष्ठानचे प्रा. किरण सोनटक्के यांनी दिलेली साद महत्त्वपूर्ण ठरली. 


वयाच्या १८ व्या वर्षी फोनवर बोलत असताना तोल जाऊन शॉक लागल्याच्या अपघातात शेखरला डावा पाय व डावा हात तसेच उजव्या पायाची बोटे गमवावी लागली. मात्र त्याची अांतरिक तळमळ व जिद्द त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. अशा परिस्थितीत रशियातील सर्वात उंच माउंट एलब्रुस हे शिखर सर करून दिव्यांग कुठेही कमी पडत नाही हे त्याने सिद्ध केले. दक्षिण आफ्रिकेतील माउंटन किलिमंजारो हे शिखर सर करणारा तो पहिला भारतीय दिव्यांग गिर्यारोहक ठरला होता. त्याच्या या यशाची गाथा ज्ञानसाधनाचे संस्थापक प्रा. सोनटक्के यांना समजल्यानंतर सामाजिकतेचे भान राखत त्यांनी शेखरला सहकार्य करण्याचे ठरवले. ऑस्ट्रेलियातील सर्वात उंच शिखर सर करण्यासाठी लागणारी सर्वतोपरी मदत प्रा. सोनटक्के यांनी त्याला दिली. 

या मदतीच्या साहाय्याने सिडनीच्या वायव्य दिशेला २४० मैल ३९० किमी अंतरावरील हे शिखर समुद्रसपाटीपासून २ हजार २०० मीटर उंच आहे. ते शेखरने सोमवारी सकाळी सर केले.
 

समाजाप्रति देणे लागतो : प्रा. किरण सोनटक्के

शेखर गौडच्या संघर्षाची व जिद्दीची कहाणी माझे मित्र संदीप देऊळगावकर यांनी आपल्याला सांगितली. अशा प्रकारे आपले कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी निघालेल्या तरुणाला सहकार्य करणे हे आपले कर्तव्य आहे. समाजाप्रति आपण देणे लागतो या भूमिकेतूनच शेखरला सर्वतोपरी सहकार्य व मोहिमेसाठी शुभेच्छा दिल्या. त्यानेही जिद्दीने शिखर सर केले.
 

बातम्या आणखी आहेत...