आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई: टीव्ही अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीचा एक्स बॉयफ्रेंड असलेल्या शरद मल्होत्राने नुकत्याच एका मुलाखतीत आपल्या पर्सनल आयुष्याविषयी एक मोठा खुलासा केला. एका मुलाखतीत शरदला विचारण्यात आले की, त्याचे आणि दिव्यांकाचे नाते का तुटले? यावर शरद म्हणाला की, "माझ्याकडे सांगण्यासाठी जास्त काही नाही. परंतू एकच सांगेल की, हे नाते खुप सुंदर होते. परंतू लग्नापर्यंत गोष्ट पोहोचताच मी खुप अस्वस्थ झालो. ही गोष्ट खुप जुनी आहे आणि तेव्हा मी जराही मॅच्योर नव्हतो. मी चुक केली. एक माणुस म्हणून आपण अनेक चुका करतो. मला आता चुकीची जाणिव आहे. परंतू आता खुप काळ लोटला आहे. आम्ही दोघंही आपापल्या आयुष्यात खुप पुढे गेलो आहोत."
एक्स बॉयफ्रेंडविषयी बोलताना रडली होती दिव्यांका
सोशल मीडियावर दिव्यांका त्रिपाठीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता.. यामध्ये ती आपला Ex-बॉयफ्रेंड शरद मल्होत्राविषयी बोलताना इमोशनल झालेली दिसली होती. दिव्यांका त्रिपाठ एक चॅट शो 'जज्बात' मध्ये पोहोचली होती. येथे तिला शरद विषयी विचारले तेव्हा ती इमोशनल झाली. शोचा होस्ट राजीव खंडेलवालने तिला विचारले की, हार्टब्रेकमधून तु काय शिकली. तर दिव्यांकाने सांगितले की, "माझे 8 वर्षे, त्या काळात असे वाटत होते की, आयुष्य संपत आहे. मी अंधविश्वासात गेले होते. कदातिच मी प्रेमाशिवाय राहू शकत नाही."
जवळपास 8 वर्षे होते दिव्यांका-शरद यांचे अफेअर
शरद मल्होत्रा आणि 'ये है मोहब्बते' फेम अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी जवळपास 8 वर्षे रिलेशनशीपमध्ये होते. 'बनू मै तेरी दुल्हन' या मालिकेपासून त्यांचे अफेअर सुरु झाले होते. परंतू दोघांनीही आपले नाते स्विकारले नव्हते. नंतर 2015 मध्ये यांची जोडी वेगळी झाली. 2016 मध्ये दिव्यांकाने विवेक दहियासोबत लग्न केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.