आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हायरल फोटोमध्ये दिसले दिव्यांका त्रिपाठीचे बेबी बंप, अभिनेत्रीच्या पतीने केली चेष्टा, म्हणाला, ही एडिटिंग नाही, खरे आहे 

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : टीव्ही शो 'ये है मोहब्बतें' फेम दिव्यांका त्रिपाठीच्या प्रेग्नन्सीच्या बातम्या सध्या खूप चर्चेत आहेत. आता अभिनेत्री आणि आणि तिचा पती विवेक दहिया याबद्दल स्पष्टपणे बोलले आहेत. विवेकने गमतीशीरपणे म्हंटले, "ही एडिटिंग नाही. खरे आहे. जेव्हा आम्हाला अफवेची गरज असते तेव्हा आम्ही उशी पोटाला लावून फोटो क्लिक काढतो" झाले असे की, दिव्यांका सध्या टीव्ही शो 'द वॉइस' होस्ट करत आहे. याच्याच सेटवरून तिचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये तीने जो आउटफिट घातले आहे, त्यामध्ये तिचे पोट हाइलाइट होत आहे. याच्याच नंतर तिच्या प्रेग्नन्सीच्या बातम्या मीडियामध्ये सुरु आहेत. 

दिव्यांकानेही केले रिएक्ट...
प्रेग्नन्सीच्या बातमीला खोटे सांगत दिव्यांका म्हणाली, "ज्या व्यक्तीने त्या फोटोला एडिट केले आहे तो खूप टॅलेंटेड आहे. त्याने फोटोला असे एडिट केले आहे की, माझे पोट खरंच वाढलेले दिसत आहे. मला माहित नाही की, ही कुणाची चेष्टा आहे" यासोबतच तिचे म्हणणे आहे की, या फोटोबद्दल भले तिचे फॅन्स नाराज असतील पण ती तर हा फोटो पाहून खूप हसली होती.