• Home
  • TV Guide
  • divyanka tripathi's ex boyfriend sharad malhotra is now marrying to girlfriend ripchi bhatiya

लग्नाच्या भीतीने दोनदा पळाला होता दिव्यांका त्रिपाठीचा Ex बॉयफ्रेंड, आता बांधला जात आहे बंधनात, झाला साखरपुडा, आता भावी पत्नीसोबत चालणार आहे सप्तपदी 

लग्नाचे नाव ऐकूनही नर्वस होत होता अभिनेता, स्वतः केला होता खुलासा... 

दिव्य मराठी वेब टीम 

Apr 17,2019 05:20:00 PM IST

एंटरटेनमेंट डेस्क : दिव्यांका त्रिपाठीचा एक्स-बॉयफ्रेंड शरद मल्होत्रा दिल्ली बेस्ड डिजायनर रिप्ची भाटियासोबत लग्न करणार आहे. दोघांचा अशातच साखरपुडा झाला आहे. या सेरेमनीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. शरद, रिप्चीसोबत 20 एप्रिलला लग्न करत आहे. तसेच लग्नाचे बाकीचे फंक्शन 18 एप्रिलपासून सुरु होणार आहेत. यापूर्वी शरद दोनदा लग्नाच्या नावाने पळाला आहे. रिप्चीच्या अगोदर शरद, दिव्यांका त्रिपाठी आणि पूजा बिष्ट यांच्यासोबत रिलेशनमध्ये होता. दोघींसोबतही लग्न जवळपास ठरले होते पण नाते जमू शकले नाही.

लग्नाला घाबरत होता शरद मल्होत्रा...
रिपोर्ट्सनुसार, टीव्हीवर 'भारत का वीर पुत्र : महाराणा प्रताप' सारख्या सीरियल्समध्ये लीड रोल केलेला शरदचे मागचे दोन्ही ब्रेकअप यामुळे झाले की, तो लग्नाला घाबरत होता. 2015 मध्ये त्याचे ब्रेकअप दिव्यांका त्रिपाठीसोबत झाले. दोघे सुमारे 8 वर्षे एकमेकांना डेट करत होते. पण सांगितले जाते की, दिव्यांकाला लग्नाचे कमिटमेंट हवे होते आणि शरद यासाठी तयार नव्हता. नंतर अभिनेत्रीने 'ये है मोहब्बतें' मधील तिचा को-एक्टर विवेक दहियासोबत लग्न केले.

- दिव्यांकानंतर शरदचे अफेयर 'स्प्लिट्स विला' फेम पूजा बिष्टसोबत सुरु झाले. पूजाने एका इंटरव्यूमध्ये सांगितले होते की, शरद डेटिंगच्या पहिल्या दिवशीच लग्नाविषयी बोलला होता. मात्र, दोन वर्षेनंतर हे नातेही तुटले. शरदने एका इंटरव्यूमध्ये सांगितले होते की, तो लग्नाच्या णवणे किती घाबरत होता. त्याने सांगितले होते, 'मला वाटते मी लग्नाला खूप घाबरतो. जेव्हाही याच्याशी निगडित एखादा टॉपिक येतो मी नर्वस फील करू लागतो आणि पाय मागे घेतो. निश्चितच मी माझ्या पार्टनरला यासाठी जबाबदार नाही ठरवू शकत. मला यावर काम करण्याची गरज आहे.'

X
COMMENT