द व्हॉइस : बेस्टफ्रेंडचे लग्न अटेंड करण्यासाठी दिव्यांकाने मागितला शोमधून ब्रेक, तर मेकर्सने केले तिला रिप्लेस

दिव्यांकाच्या जागी करण वाहीला घेतले जाणार आहे... 

दिव्य मराठी

Apr 24,2019 05:28:00 PM IST

टीव्ही डेस्क : दिव्यांका त्रिपाठीला सिंगिंग रियलिटी शो-द व्हॉईसमध्ये होस्ट म्हणून पुढच्या आठवड्यापासून बघता येणार नाही. झाले असे होते की, दिव्यांकाने आपल्या बेस्टफ्रेंडलग्नाला जाण्यासाठी शोमधून ब्रेक घेण्याचा विचार केला होता. पण मेकर्सने तिचे म्हणणे मान्य केले नाही आणि परिणामी तिला शोमधून रिप्लेस केले गेले.

दिव्यांकाने पर्सनल कमिटमेंटमुळे याबाबतीत जवळपास एक महिन्यापूर्वीच टीमला सूचित केले होते. पण चॅनल शूटिंगच्या डेट्स अॅडजस्ट करू शकले नाही आणि तिच्याजागी दुसरा टीव्ही अॅक्टर करण वाहीला घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

प्रोडक्शन हाउसच्या एका जवळच्या सूत्राने सांगितले की, “दिव्यांकाला अपेक्षा होती की, मेकर्स शूटिंगची वेळ अॅडजस्ट करतील. ऐनवेळी हे होऊ शकले नाही आणि त्यामुळे अखेर शोच्या आगामी 2 एपिसोड्सच्या होस्टिंगसाठी करण वाहीला घेतले जात आहे. हा शो मे 2019 मध्ये संपणार आहे.

X