आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Divyanka's Husband Vivek Was Hospitalized, Actress Said 'that 5 Days Were Like Hell For Us'

दिव्यांकाचा पती विवेक होता रुग्णालयात भरती, अभिनेत्री म्हणाली - 'ते पाच दिवस आमच्यासाठी नर्काप्रमाणे होते' 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : मागच्या आठवड्यात दिव्यांका त्रिपाठीचा पती विवेक दाहियाला रुग्णालयात भरती केले गेले होते. त्याला आतड्यांचे इन्फेक्शन झाले होते. अशातच एका इंटरव्यूदरम्यान दिव्यांकाने सांगितले की, 'ते पाच दिवस तिच्यासाठी आणि संपूर्ण कुटुंबासाठी खूप भयावह आणि नर्कासारखे होते. ती म्हणाली, "विवेक हॉस्पिटलमधून डिस्चार्ज झाला आहे, पण अजूनही घरी रिकव्हर होत आहे. डॉक्टर्सने त्याला 3-4 आठवडे आराम करण्याचा सल्ला दिला आहे. त्याने खराब ऍन खाल्ले असेल, ज्यामुळे त्याला इन्फेक्शन झाले होते."

 

सुरुवातीला फीवर आला होता... 
दिव्यांका त्रिपाठीने पुढे सांगितले, "आम्ही चीन आणि मकाऊहुन परतल्यानंतर त्याला ताप आला होता. अँटीबायोटिक्स निम्मी आल्या नाही. आम्हाला जराही अंदाज नव्हता की, हे सर्व एवढे गंभीर स्वरूप धारण करेल. ते पाच दिवस मी आणि माझ्या फॅमिलीसाठी नर्कासारखे होते. माझी रडून रडून वाईट अवस्था झाली होती. कारण मी त्याला अशा अवस्थेत बघू शकत नव्हते. आम्ही प्रत्येक निर्णय आपल्या सहमतीने घेतो आणि इथे हॉस्पिटलपासून ते डॉक्टर्सच्या काळजी घेण्यापर्यंत सर्वकाही मला ठरवायचे होते. मी त्याचे मत घेऊ इच्छित होते, पण हिंमत एकवटून मी कठीण निर्णय घेतले. मी त्याच्यासाठी खूप घाबरलेले होते."

 

सकारात्मक व्यक्ती आहे विवेक... 
दिव्यांका म्हणाली, "तो खूप सकारात्मक आहे. जेव्हा त्याला बरे वाटू लागले तेव्हा त्याने हसत हसत आमच्याकडे पहिले. आम्ही आमच्या आरोग्याची काळजी घेतो. अशात पैसे आणि प्रसिद्धीची कहीही किंमत नसते. प्रेम आणि तुमच्या आसपासचे लोक महत्वाचे असतात. यापेक्षा जास्त आम्हाला याची जाणीव झाली की, लोक आमची किती काळजी घेतात. अनेक लोक ज्यांना आम्ही आमचे मित्र मनात होतो, ते आम्हाला भेटायलाही आले नाही. आम्ही सत्याची परख केली."  

 

'नच बलिए 9' मध्ये दिसणार आहे कपल... 
दिव्यांका आणि विवेक जूनच्या अखेरच्या आठवड्यात चीन आणि कमाऊला फिरण्यासाठी गेले होते. तेथून परतल्यानंतर विवेक आजारी पडला होता. आता तो घरी आहे आणि आधीपेक्षा ठीक आहे. विवेक आजारी पडण्यापूर्वी कपलने डान्सिंग रियलिटी शो 'नच बलिए 9' च्या प्रीमियरसाठी परफॉर्मन्स शूट केला होता, जो 19 जुलैला टेलीकास्ट केला जाईल.