आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सणांचा समूह आहे दिवाळी, 5 नोव्हेंबरला धनत्रयोदशी आणि 7 नोव्हेंबरला साजरी केली जाईल दिवाळी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कार्तिक मासातील अमावास्येला दिवाळी साजरी केली जाते. दिवाळी सण भारतीय सभ्यता आणि संस्कृतीचा एक प्रमुख उत्सव आहे. दिवाळी साजरी करण्यामागे विविध कथा आणि प्रथा प्रचलित आहेत. परंतु या सर्वांमध्ये सार असा आहे की, वाईटावर चांगल्या गोष्टीचा विजय. यावर्षी हा सण 7 नोव्हेंबर बुधवारी आहे.


वास्तवामध्ये दिवाळी फक्त एक सण नसून हा सणांचा समूह आहे. दिवाळी 5 दिवस साजरी केली जाते. सर्वात पहिले कार्तिक कृष्ण त्रयोदशीला धनत्रयोदशी (यावेळी 5 नोव्हेंबर, सोमवार) साजरी केली जाते. या दिवशी भगवान धन्वंतरी यांची पूजा केली जाते. दुसऱ्या दिवशी नरक चतुर्दशी (6 नोव्हेंबर, मंगळवार) व्रत आणि पूजन केले जाते. याच्या नंतर दिवाळी (7 नोव्हेंबर, बुधवार) लक्ष्मी पूजन केले जाते. त्यानंतर कार्तिक शुक्ल प्रतिपदेला बलिप्रतिपदा (8 नोव्हेंबर गुरुवार) गोवर्धन पूजा केली जाते. त्यानंतर भाऊबीज (9 नोव्हेंबर, शुक्रवार) साजरी केली जाते.


दिवाळीशी संबंधित लाईफ मॅनेजमेंट
प्राचीन काळापासून हिंदू धर्मावलंबी दिवाळीचा सण उत्साहात साजरा करतात. अमावास्येच्या अंधकाराविरुद्ध छोट्या-छोट्या दिव्यांच्या प्रकाशाचा संघर्षरूपी संदेश देणे, हाच या सणांचा मूळ उद्देश्य आहे. येथे अंधकाराचा अर्थ मनामधील नकारात्मक विचारांशी आहे तर दिवा त्याच मनामध्ये दडून बसलेल्या सकारात्मक विचारांचे प्रतीक आहे. दिवाळी सणाला भारतीय संस्कृतीच्या अस्मितेचे प्रतीक म्हटले तर अतिशोक्ती ठरणार नाही.

बातम्या आणखी आहेत...