Home | Jeevan Mantra | Dharm | diwali 2018 goddess lakshmi and cow story

गोमातेने केला होता देवी लक्ष्मीचा त्याग, गोमूत्र आणि शेणामध्ये आहे लक्ष्मीचा निवास

रिलिजन डेस्क | Update - Nov 07, 2018, 12:09 AM IST

गायीच्या शेणामध्ये निवास करते देवी लक्ष्मी, लिहिले आहे या ग्रंथामध्ये

 • diwali 2018 goddess lakshmi and cow story

  हिंदू धर्मामध्ये गायीला पवित्र आणि शुभ मानण्यात आले आहे. अनेक धर्म ग्रंथांमध्ये गायीला मोक्ष प्रदान करणारी सांगण्यात आले आहे. धार्मिक मान्यतेनुसार गायीमध्ये देवी महालक्ष्मीला वास असतो. या संदर्भात महाभारतातील अनुशासन पर्वामध्ये पितामह भीष्म यांनी धर्मराज युधिष्टिरला एक कथा सांगितली आहे. या कथेनुसार गायीच्या गोमुत्र आणि शेणामध्ये लक्ष्मीचा निवास मानण्यात आला आहे. याच कारणामुळे गायीचे शेण आणि मुत्र पवित्र मानले जाते. दिवाळी (7 नोव्हेंबर, बुधवार) च्या निमित्ताने आम्ही तुम्हाला हा पूर्ण प्रसंग सांगत आहोत, जो पुढीलप्रमाणे आहे...


  कथा -
  प्राचीन काळी देवी लक्ष्मीने एकदा मनोहर रूप धारण करून गायीच्या कळपामध्ये प्रवेश केला. त्यांचे हे सुंदर रूप पाहून गायींनी विचारले की, तुम्ही कोण आहात? आणि कोठून आला आहात? तुम्ही पृथ्वीवरील अनुपम सुंदरी दिसत आहात. अगदी खर सांगा, तुम्ही कोण आहत आणि कोठे जाणार?


  तेव्हा देवी लक्ष्मीने गायींना सांगितले की - हे गायींनो, तुमचे कल्याण असो, मी या जगात लक्ष्मी नावाने प्रसिद्ध आहे. संपूर्ण जग माझी कामना करते. मी दैत्यांचा त्याग केल्यामुळे ते नष्ट झाले आहेत आणि इंद्र, सूर्य, चंद्र, विष्णू, वरुण तसेच अग्नी इ. देवता माझ्या आश्रयात राहत असल्यामुळे सर्व आनंद उपभोगत आहेत. ज्यांच्या शरीरात मी प्रवेश करत नाही, ते नष्ट होतात. आता मी, तुमच्या शरीरात निवास करण्यास इच्छुक आहे.


  संपूर्ण कथा वाचण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

 • diwali 2018 goddess lakshmi and cow story

  जेव्हा गायींनी लक्ष्मीचा केला त्याग
  देवी लक्ष्मीचे हे शब्द ऐकून गायी म्हणाल्या की, तुम्ही फार चंचल आहात, कोठेही एका ठिकाणी वास्तव्य करत नाहीत. या व्यतिरिक्त तुम्ही अनेकांसोबत संलग्न आहात, यामुळे आम्हाला तुमची ही इच्छा मान्य नाही. तुमची जेथे जाण्याची इच्छा असेल तेथे तुम्ही निघून जा. तुम्ही आमच्यासोबत संवाद साधला, एवढ्यानेच आम्ही स्वतःला धन्य मानतो.


  गायींचे हे उत्तर ऐकल्यानंतर लक्ष्मी म्हणाली की, तुम्ही हे काय बोलत आहात. मी दुर्लभ आणि सती असूनदेखील तुम्ही माझा स्वीकार करत नाहीत, यामागे काय कारण आहे. देवता, दानव, मनुष्य इ. सर्वजण माझी कठोर तपश्चर्या करून मला प्रसन्न करतात. यामुळे तुम्ही माझा स्वीकार करा. या विश्वामध्ये कोणीही माझा अपमान करत नाही.


  यावर गायी म्हणाल्या की, आम्ही तुमचा अपमान किंवा अनादर करत नसून, केवळ तुमचा त्याग करत आहोत. कारण तुम्ही चंचल आहात आणि एकाठिकाणी वास्तव्य करत नाहीत. आता जास्त चर्चा करून काहीही फायदा नाही, तुम्हाला जेथे जाण्याची इच्छा असेल तिकडे तुम्ही जा.

 • diwali 2018 goddess lakshmi and cow story

  यामुळे गाईचे शेण आणि गोमुत्र मानले जाते पवित्र
  त्यानंतर देवी लक्ष्मी गायींना म्हणाली की, तुम्ही इतरांना आदर देणाऱ्या आहात, जर तुम्ही माझा त्याग केला तर संपूर्ण विश्वात माझा अनादर होऊ लागेल. यामुळे तुम्ही माझ्यावर कृपा करा. तुम्ही नेहमीच सर्वांचे कल्याण करणाऱ्या, पवित्र आणि सौभाग्यवती आहात. मला आज्ञा द्या, मी तुमच्या शरीरातील कोणत्या भागामध्ये निवास करू?


  गायींनी सांगितले - हे यशस्विनी! आम्ही तुमचा सन्मान करणे आवश्यक आहे. यामुळे तू आमच्या मुत्र आणि शेणामध्ये निवास कर, कारण आमच्या या दोन्ही गोष्टी परम पवित्र आहेत.


  त्यानंतर देवी लक्ष्मीने सांगितले की, मी तुमच्या गोमुत्र आणि शेणामध्ये वास करेल, तुम्ही माझा मान ठेवला यामुळे तुमचे कल्याण होवो.

Trending