Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | diwali 2018 lakshmi mantra according rashi

दिवाळी : प्रत्येक राशीचे 3 उपाय आणि लक्ष्मीचा खास मंत्र, होऊ शकता धनवान

रिलिजन डेस्क | Update - Nov 07, 2018, 12:01 AM IST

धन प्राप्तीसाठी प्रत्येक व्यक्तीने स्वतःच्या राशीनुसार करावा लक्ष्मी मंत्राचा जप

 • diwali 2018 lakshmi mantra according rashi

  आश्विन महिन्याची अमावास्या, लक्ष्मीपूजनाचा दिवस, त्या महारात्री मानवाने रचलेला सोहळा, उंच टांगलेले आकाशदिवे, मंदिरांवरील रोषणाई, घराघरांपुढील, दारे-खिडक्या, अंगणात तेवणाऱ्या पणत्या, फटाक्यांची आतषबाजी अशा या तेजदीप्त अमावास्येचा हा वर्षातील एकमेव दिवस देशभर दिवाळीच्या रूपात साजरा होतो.


  ज्योतिष शास्त्रानुसार या दिवशी (7 नोव्हेंबर, बुधवार) करण्यात आलेल्या उपायांचे शुभफळ लवकर प्राप्त होते. दिवाळीच्या दिवसांमध्ये राशीनुसार उपाय केल्यास लक्ष्मी साधकावर प्रसन्न होऊन त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करते. आज आम्ही तुम्हाला दिवाळीला राशीनुसार करण्यात येणारे काही खास उपाय सांगत आहोत. हे उपाय अगदी सोपे आणि अचूक आहेत.


  मेष -
  1 - दिवाळीच्या दिवशी रात्री पांढर्या रंगाच्या कपड्यावर लाल चंदन आणि केशर उगाळून लावा. रंगवलेले पांढरे कापड तिजोरीत किंवा पैसे ठेवण्याच्या जागेवर ठेवा. हा उपाय केल्यास सुख-समृद्धीमध्ये वृद्धी होईल तसेच धनहानी होणार नाही.
  2 - घराच्या मुख्य दाराजावर तेलाचा दिवा लावा आणि त्यामध्ये दोन काळे गुंज टाकल्यास वर्षभर तुम्हाला आर्थिक अडचण भासणार नाही. तुमचा अडकलेला पैसा परत मिळेल.
  3 - मेष राशीच्या लोकांनी दिवशी दिवशी रात्री खालील मंत्राचा जप करावा.
  ऊँ ऐं क्लीं सौ:


  वृषभ -
  1 -
  भरपूर पैसा कमावूनही त्यामध्ये बचत होत नसेल तर दिवाळीमध्ये लक्ष्मी पुजेसोबत कमळाच्या फुलाचेही पूजन करावे. पूजा झाल्यानंतर हे फुल लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवा.
  2 - मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी दिवाळीच्या दिवशी रात्री गाईच्या तुपाचे दोन दिवे एकांत ठिकाणी लावा. तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होईल.
  3 - वृषभ राशीच्या लोकांनी स्फटीकाच्या माळेने खालील मंत्राचा जप करावा...
  ऊँ ऐं क्लीं श्रीं


  मिथुन -
  1 -
  नेहमी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असेल तर दिवाळीच्या दिवशी रात्री लक्ष्मी-गणेशाची पूजा करताना दक्षिणावर्ती शंखाची पूजा करावी. या उपायाने आर्थिक स्थितीमध्ये सुधार होईल.
  2 - कर्जामुळे अडचणीत असाल तर लक्ष्मी पूजेनंतर गणपतीला हळदीची माळ अर्पण करा. या उपायाने सर्व समस्या समाप्त होतील.
  3 - मिथुन राशीच्या लोकांनी स्फटीकाच्या माळेने खालील मंत्राचा जप करावा...
  ऊँ क्लीं ऐं स:


  कर्क -
  1-
  जर तुम्हाला धनलाभाची अभिलाषा असेल तर दिवाळीच्या दिवशी रात्री पिंपळाच्या झाडाखाली पंचमुखी तेलाचा दिवा लावावा.
  2 - दिवाळीच्या दिवशी त्रिकोणी आकाराचा पिवळा झेंडा विष्णू देवाच्या मंदिरावर लावल्यास पुढील दिवाळीपर्यंत तुमचे भाग्य उजळेल.
  3 - कर्क राशीच्या लोकांनी स्फटीकाच्या माळेने खालील मंत्राचा जप करावा...
  ऊँ क्ली ऐं श्रीं


  सिंह -
  1 -
  दिवाळीच्या दिवशी रात्री घराच्या मुख्य दारासमोर गाईच्या तुपाचा दिवा लावा. दुसर्या दिवशी सकाळपर्यंत हा दिवा विझला नाही तर पुढील दिवाळीपर्यंत तुमच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधार होईल तसेच मान-सन्मानामध्ये वाढ होईल.
  2 - एखादा शत्रू त्रास देत असेल तर दिवाळीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाच्या पानावर डाळिंबाच्या काडीने शत्रूचे नाव लिहा आणि ते पान जमिनीत पुरून टाका.
  3 - सिंह राशीच्या लोकांनी स्फटीकाच्या माळेने खालील मंत्राचा जप करावा...
  ऊँ ह्रीं श्रीं सौं:


  कन्या -
  1 -
  जर तुम्हाला आर्थिक अडचण असेल तर दिवाळीच्या दिवशी रात्री लाल रूमालामध्ये नारळ बांधून तुमच्या तिजोरीत हे नारळ ठेवा. धनत्रयोदशीच्या दिवशी कमळाच्या फुलांचा हार लक्ष्मीला अर्पण करा.
  2 - जर तुम्हाला नोकरी संदर्भात एखादी अडचण असेल तर धनत्रयोदशीपासून दिवाळीपर्यंत गोड तांदूळ कावळ्याला टाका. यामुळे तुमची नोकरीची अडचण दूर होईल.
  3 - कन्या राशीच्या लोकांनी स्फटीकाच्या माळेने खालील मंत्राचा जप करावा...
  ऊँ श्रीं ऐं सौं


  तूळ -
  1
  - जर तुम्हाला व्यवसायात तोटा होत असेल तर दिवाळीच्या दिवशी वडाच्या झाडाच्या पानावर ऊँ श्रीं श्रियै नम: हा मंत्र लिहून हे पान नदीमध्ये प्रवाहित करा.
  2 - लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त करण्यासाठी तूळ राशीच्या लोकांनी सकाळी नित्यकर्म झाल्यानंतर लक्ष्मी मंदिरात जाउन ११ नारळ अर्पण करावेत.
  3 - तूळ राशीच्या लोकांनी स्फटीकाच्या माळेने खालील मंत्राचा जप करावा...
  ऊँ ह्रीं क्लीं श्रीं

 • diwali 2018 lakshmi mantra according rashi

  वृश्चिक -
  1 -
  या राशीच्या लोकांनी धन प्राप्तीसाठी दिवाळीच्या दिवशी घराच्या अंगणामध्ये दोन केळीची झाडे लावावीत. परंतु या झाडाच्या फळांचे सेवन करू नये.
  2 - घरामध्ये अशांती असेल तर दिवाळीच्या दिवशी रात्री नागचंपा (नागकेशर) झाडाचे फुल आणून घरामध्ये कोणालाही दिसणार अशा ठिकाणी ठेवा. घरामध्ये शांतीचे वातावरण निर्माण होईल.
  3 - वृश्चिक राशीच्या लोकांनी स्फटीकाच्या माळेने खालील मंत्राचा जप करावा...
  ऊँ ऐं क्लीं सौ:

 • diwali 2018 lakshmi mantra according rashi

  धनु -
  1 -
  या राशीच्या लोकांनी धन प्राप्तीसाठी दिवाळीच्या दिवशी विड्याच्या पानावर 'श्रीं' लिहून हे पान देवघरात ठेवावे. दररोज या पानाची पूजा करावी.
  2 - धनु राशीच्या लोकांनी दिवाळीच्या दिवशी रात्री लक्ष्मी पुजेसोबतच ५ गोमती चक्रांचे पूजन करावे. पूजा झाल्यानंतर हे गोमती चक्र तिजोरीत ठेवावेत. या उपायाने धनलाभ होईल.
  3 - धनु राशीच्या लोकांनी स्फटीकाच्या माळेने खालील मंत्राचा जप करावा...
  ऊँ ह्रीं क्लीं सौ:

 • diwali 2018 lakshmi mantra according rashi

  मकर -
  1 -
  खूप दिवसांपासून अडकेलेला पैसा परत मिळवण्यासाठी दिवाळीच्या दिवशी ईशान्य कोपर्यात दिवा लावून ठेवावा.
  2 - लग्न जमण्यात अडचण येत असेल तर दिवाळीच्या दिवशी विष्णूदेवाची पूजा करावी आणि पिवळे वस्त्र अर्पण करून पिवळ्या रंगाच्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा.
  3 - मकर राशीच्या लोकांनी स्फटीकाच्या माळेने खालील मंत्राचा जप करावा...
  ऊँ ऐं क्लीं सौ:

 • diwali 2018 lakshmi mantra according rashi

  कुंभ -
  1 -
  जोडीदारासोबत सतत वाद होत असतील तर दिवाळीच्या दिवशी खीर तयार करावी. लक्ष्मीला हा खिर नैवेद्य दाखवून स्वतः ग्रहण करावी.
  2- धन प्राप्तीसाठी दिवाळीच्या दिवशी नारळाच्या करवंटीमध्ये तुप टाकून लक्ष्मीसमोर दिवा लावावा.
  3 - कुंभ राशीच्या लोकांनी स्फटीकाच्या माळेने खालील मंत्राचा जप करावा...
  ऊँ ह्रीं ऐं क्लीं श्रीं

 • diwali 2018 lakshmi mantra according rashi

  मीन -
  1 -
  धन प्राप्तीसाठी दिवाळीच्या दिवशी एखाद्या लक्ष्मी मंदिरात जाऊन कमळाचे फुल आणि नारळ अर्पण करा.
  2 - धन लाभासाठी दिवाळीच्या दिवशी एखाद्या लक्ष्मी मंदिरात जाऊन कमळाचे फुल आणि नारळ अर्पण करा तसेच पांढर्या मिठाईचा नैवेद्य दाखवा. यामुळे तुमची आर्थिक अडचण दूर होईल.
  3 - मीन राशीच्या लोकांनी स्फटीकाच्या माळेने खालील मंत्राचा जप करावा...
  ऊँ ह्रीं क्लीं सौ:

Trending