Home | Jeevan Mantra | Dharm | diwali 2018 lakshmi pujan rituals

दिवाळीला लक्ष्मी पूजनामध्ये या प्रथांचे पालनही आवश्यक, यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व

रिलिजन डेस्क | Update - Nov 07, 2018, 12:07 AM IST

लक्ष्मी पूजेमध्ये अवश्य करा या गोष्टी, प्राप्त होईल सुख-समृद्धी

 • diwali 2018 lakshmi pujan rituals

  बुधवार 7 नोव्हेंबरला दिवाळी असून या दिवशी लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते. पूजा करताना छोट्या-छोट्या, परंतु महत्त्वपूर्ण परंपरांचे पालन केले जाते. उदाहरणार्थ मनगटावर लाल दोरा बांधणे, अक्षता टाकणे, टिळा लावणे, टिळा लावताना डोक्यावर हात किंवा रुमाल ठेवणे, कापूर लावून आरती करणे. येथे जाणून घ्या, या परंपरांचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व...


  पूजा करतना मनगटावर लाल दोरा (गंडा) बांधा
  हिंदू धर्मात पूजा, यज्ञ, हवन करताना ब्राम्‍हण आपल्‍या हातात लाल धागा बांधतात. हा धागा बांधल्‍याने त्रिदेव म्‍हणजे ब्रह्मा, विष्‍णु, महेश त्‍याचबरोबर तीन देवी- लक्ष्‍मी, पार्वती आणि सरस्‍वतीची कृपा प्राप्‍त होते. ब्रह्माच्‍या कृपेने कीर्ती, विष्‍णुच्‍या कृपेने ताकद आणि महादेवाच्‍या कृपेने दुर्गुणांचा विनाश होतो. त्‍याचप्रमाणे लक्ष्‍मीकडून धन, दुर्गेपासून शक्ति आणि सरस्‍वतीपासून बुद्धी प्राप्‍त होते.


  शरीर विज्ञानाच्‍या दृष्‍टीने पाहिल्‍यास हातात धागा बांधल्‍याने उत्तम आरोग्‍य प्राप्‍त होते. शरीराचे त्रिदोष म्‍हणजे वात, पित्त आणि कफावर नियंत्रण मिळवता येते. हातात सर्वप्रथम धागा दानवीर राजा बळीच्‍या अमरतेसाठी वामन भगवानने त्‍यांच्‍या मनगटावर हे रक्षा सूत्र बांधले होते.


  दोरा बांधल्यानंतर तांदूळ मागे टाका
  पूजेमध्ये मनगटावर दोरा बांधताना हातामध्ये तांदूळ दिले जातात. दोरा बांधल्यानंतर हे तांदूळ स्वतःच्या मागे टाकले जातात. अशाप्रकारे तांदूळ मागे टाकण्याचा उद्येश्य असा आहे की, तांदळासोबत आपल्या सर्व अडचणी दूर व्हाव्यात. मनगटावर दोरा बांधल्याने सर्व दुःख दूर होतात आणि मनगटावर मंत्रशक्तीने बांधलेला दोर व्यक्तीचे रक्षण करतो.


  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, टिळा आणि कापूर विषयी खास गोष्टी...

 • diwali 2018 lakshmi pujan rituals

  टिळा -
  पूजा करताना गंध, टिळा लावला जातो. यामुळे मस्तकात बुद्धी, ज्ञान आणि शांतीचा प्रसार होतो, कोणतेही पूजन कर्म गंधाशिवाय पूर्ण होत नाही. माथ्यावर जेथे टिळा लावला जातो, तेथे आज्ञा चक्र असते आणि या स्थानावर टिळा लावल्यास मनाची एकग्रता होते. पूजा करताना मन व्यर्थ गोष्टींकडे जाऊ नये म्हणून टिळा लावून मन एकाग्र केले जाते.


  टिळा लावताना डोक्यावर रुमाल ठेवा
  कपाळाला टिळा लावतान डोक्यावर हात किंवा रुमाल ठेवला जातो. देवांना आणि टिळा लावणाऱ्या व्यक्तीला सन्मान देण्याची ही एक पद्धत आहे. पूजा करतना कपडा डोक्यावर यामुळे ठेवला जातो की, पुजेमधून मिळणारी उर्जा आपल्या डोक्यातून आकाशाकडे निघून जाऊ नये.  डोक्याच्या मध्यभागी दशम द्वार असते, जे खूप संवेदनशील आहे. वातावरणातील सकारात्मक आणि नकारात्मक उर्जेचा थेट प्रभाव दशम द्वाराच्या माध्यमातून व्यक्तीवर पडतो. दशम द्वाराच्या सुरक्षेसाठी डोक्यावर रुमाल किंवा हात ठेवला जातो.

 • diwali 2018 lakshmi pujan rituals

  कापूर लावण्याचे धार्मिक महत्त्व
  आरतीमध्ये कापूर लावण्याची प्रथा प्राचीन काळापासून सुरु आहे. शास्त्रानुसार देवी-देवतांसमोर कापूर लावल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते. ज्या घरामध्ये नियमितपणे कापूर जाळला जातो, तेथे पितृदोष किंवा इतर प्रकारच्या दोषाचा प्रभाव राहत नाही. कापूर लावल्याने वातावरण पवित्र आणि सुगंधित होते. अशा वातावरणामध्ये देवता लवकर प्रसन्न होतात. कापुराच्या प्रभावाने घरातील वातावरणामध्ये सकारात्मक उर्जा निर्माण होते आणि याच्या सुगंधाने आपल्या विचारांमध्येही सकारात्मकता येते.


  कापूर लावण्याचे वैज्ञानिक महत्त्व
  कापूर लावण्याचे वैज्ञानिक महत्त्वसुद्धा आहे. वैज्ञानिक संशोधनाने सिद्ध झाले आहे की कापूराच्या सुगंधाने जीवाणू, विषाणू आदी नष्ट होतात. यामुळे वातावरण शुद्ध होते. यामुळे आजार दूर राहातात. त्यामुळेच पूजा, आरती आणि धार्मिक विधींमध्ये कापूराला विशेष महत्त्व आहे. रात्री झोपण्यापूर्वी कापूर जाळल्यास अनिद्रेची समस्या दूर होते तसेच वाईट स्वप्न पडत नाहीत.

Trending