Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | Diwali of Solapur sampoites, along with Dhangar community members on Raigad

रायगडावर धनगर समाज बांधवांसोबत सोलापूरच्या शिवप्रेमींची दिवाळी

प्रतिनिधी | Update - Nov 08, 2018, 11:17 AM IST

इंग्रजांनी जेव्हा रायगडावर तोफांचा भडिमार करून रायगड बेचिराख करण्याचा प्रयत्न केला.

  • Diwali of Solapur sampoites, along with Dhangar community members on Raigad

    सोलापूर - गेल्या अनेक वर्षापासून रायगडावर वास्तव्यास असलेल्या धनगर समाज बांधवांसोबत सोलापूरच्या शिवसैनिक आणि शिवप्रेमींनी दिवाळी साजरी केली. त्यांना फराळ आणि त्यांच्या मुलांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. इंग्रजांनी जेव्हा रायगडावर तोफांचा भडिमार करून रायगड बेचिराख करण्याचा प्रयत्न केला.

    नंतर रायगड ताब्यात घेतला आणि इंग्रजांनी गडावर जमेल तेवढी लूट केली. यानंतर काही धनगर समाज बांधव रायगडावर वास्तव्यास गेले. अलिखित पहारेकरी म्हणून या धनगर समाज बांधवांनी रायगडाची पहारेकरी केली. संपूर्ण रायगड सुरक्षित आणि स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला. तेव्हापासून ते आजतागायत हे पंधरा कुटुंब येथेच वास्तव्यास आहेत.

    हे कुटूंब जांभळे, करवंदे, ताक, लिंबू सरबत, झुणका भाकर आदी विकून आपला उदरनिर्वाह करीत आहेत. अशा परिस्थितीत यांची मुले गडावरून चालत जाऊन शिक्षण घेत आहेत. त्यांचा कोणीही विचार करत नाही म्हणून किंवा दखल घेत नाहीत. या धनगर समाज बांधवांच्या प्रती कृ़तज्ञता म्हणून सोलापूर येथील शिवसैनिक आणि शिवप्रेमींनी तेथे जाऊन त्यांच्यासोबत दिवाळी साजरी केली.


    फराळ, साडी-चोळी, तसेच िवद्यार्थ्यांना शालेय साहित्य देण्यात आले. यावेळी शिवसेना शहर प्रमुख प्रताप चव्हाण, सुनील काटमोरे, नवी मुंबईचे पदाधिकारी महेश खैरनार, जळगावचे पदाधिकारी तसेच विद्यार्थी सेनेचे संपर्कप्रमुख महेश धाराशिवकर यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संताजी माने, आनंद गोयल, रामचंद्र अणवेकर, अरविंद रेवणकर, राजेश हिर्जे, मल्हारी साखरे आदी उपस्थित होते.

Trending