दिव्य मराठी वेब टीम
Nov 06,2018 03:59:00 PM ISTऑटो डेस्क - सणासुदीच्या काळात टू-व्हिलर कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध ऑफर देत आहेत. या बाबतीत, टू-व्हीलर उत्पादकांनी Paytm सोबत भागीदारी केली आहे. Paytm द्वारे पेमेंट केल्यावर कंपनी ग्राहकांना कॅशबॅक देत आहे. याशिवाय, ग्राहकांना मोफत विमा आणि सवलत देखील दिली जात आहेत. जाणून घ्या कोणती कंपनी काय ऑफर देत आहे.
Honda
आपण Paytm द्वारे Honda बाईकची शोरूम किंमतीत घेतली तर आपल्याला कंपनीच्या वतीने 5,000 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. याशिवाय, Honda आपल्या ग्राहकांना Joy Club ची विनामूल्य मेंबरशीप देत आहे. तुम्ही Joy Club चे मेंबर बनल्यावर आपल्याला 2,500 रूपयांची अतिरिक्त सवलत मिळेल. दिल्लीतील अनेक डीलरशिपच्या वतीने ग्राहकांना तीन वर्षांसाठी 1 लाख रुपयांचा मोफत अपघाती विमा दिला जात आहेत.
Hero
'Hero' देखील 'होंडा'सारखी ऑफर देत आहे. हीरो Paytm द्वारे पेमेंट केल्यावर 5000 रुपये कॅशबॅक देत आहे. याशिवाय, Hero Pleasure, Hero Maestro आणि Hero Duet खरेदी केल्यावर ग्राहकांना 3000 रूपयाची अतिरिक्त सवलत मिळत आहेत. तुम्ही सरकारी कर्मचारी असाल तर हिरोकडून तुम्हाला 1000 रुपये अतिरिक्त सवलत मिळेल. या तीन ऑफर्स जोडल्या गेल्या तर ग्राहकांना एकूण 9,000 रूपयांपर्यंतचा फायदा होऊ शकतो.
Bajaj
Bajaj कंपनी त्यांच्या उत्पादनांवर 555 चा जॅकपॉट देत आहे. यामध्ये Bajaj तर्फे 5 वर्षांची वॉरंटी, 5 वर्षांचा विमा आणि पहिल्या 5 सर्व्हिसिंग मोफत देण्यात येत आहे. डीलरशिपकडे गेलात तर तेथे किंमतीमध्ये भाव देखील करू शकतात.