Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | DIY Simple home remedies for Erectile dysfunction

व्हायग्रा विसरा, किचनमधील या 9 भाज्या वाढवतील परफॉर्मन्स, दूर होईल कमजोरी

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 01, 2018, 12:03 AM IST

काही लोक कोणत्याही प्रकारच्या औषधांचे सेवन करतात आणि नंतर त्यांचे आयुष्य नरकाप्रमाणे होते.

 • DIY Simple home remedies for Erectile dysfunction

  यौन कमजोरी, शीघ्रपतन, नपुंसकता इ. समस्या दूर करण्यासाठी काही लोक कोणत्याही प्रकारच्या औषधांचे सेवन करतात आणि नंतर त्यांचे आयुष्य नरकाप्रमाणे होते. आपली नैसर्गिक संपदा एवढी विशाल आहे की, कोणत्याही प्रकारची शारीरिक कमजोरी चुटकीसरशी दूर करू शकते. केवळ धैर्य बाळगून यांचा उपयोग करणे आवश्यक आहे. याच संदर्भात आज आम्ही तुम्हाला अशा काही भाज्यांविषयी सांगत आहोत, ज्यांचा उपयोग करून तुम्ही व्हायग्रापेक्षा जास्त परफॉर्मन्स देऊ शकता.

  पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, या भाज्यांविषयी...

 • DIY Simple home remedies for Erectile dysfunction

  बीट - 

  ही भाजी बेडवर तुमच्यासाठी चमत्कार ठरू शकते. बीटमध्ये नायट्रेटचे प्रमाण भरपूर असते, जे जननांगपर्यंत रक्तप्रवाह सुरळीत ठेवण्याचे काम करते. यामध्ये असलेले पोषक तत्व नैसर्गिक रूपात शरीराला डिटॉक्स करतात आणि हार्मोनल संतुलन कायम ठेवण्यास सहायक ठरतात. या कारणामुळे बीट बेडवर तुमचा परफॉर्मन्स वाढवू शकते.

 • DIY Simple home remedies for Erectile dysfunction

  गाजर

  गाजरामध्ये व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात आढळून येते. सेक्स आणि व्हिटॅमिन्सचा खूप घनिष्ट संबंध आहे. संभोगाच्या काही काळापूर्वी एक गाजर चावून-चावून खाल्ल्यास तुमचा परफॉर्मन्स निश्चितच वाढेल. गाजरामध्ये आढळून येणारे व्हिटॅमिन ए वीर्य आणि पौरुषत्व वाढवते.

 • DIY Simple home remedies for Erectile dysfunction

  लसूण

  लसणामध्ये आढळून येणारे अॅलीसन तत्त्व जननांगामध्ये रक्तप्रवाह वाढवते आणि ब्लड व्हेन्सला पसरवते. ज्यामुळे यौन क्षमता वाढते. अनेक भागांमध्ये लसणाची चटणी करून खाल्ली जाते.

 • DIY Simple home remedies for Erectile dysfunction

  कांदा

  लसनाप्रमाणे कांदासुद्धा आपल्या कामोद्दीपक गुणामुळे ओळखला जातो. सीमित प्रमाणात कांद्याचे नियमित सेवन केल्यास हा यौन अंगांचे आरोग्य वाढवून कामेच्छेमध्ये सुधार करू शकतो.

 • DIY Simple home remedies for Erectile dysfunction

  भेंडी

  भेंडी सी व्हिटॅमिनचा उत्तम स्रोत आहे. झिंकची कमतरता स्तंभन समस्यांमधील प्रमुख कारणांमधील एक आहे. हे तत्त्व थकवा दूर करून यौन शक्तीला पुन्हा पुनर्जीवित करते.

 • DIY Simple home remedies for Erectile dysfunction

  मशरूम

  मशरूममध्ये व्हिटॅमिन 'डी' आढळून येते, हे तत्व सेक्स लाईफला मजबूत ठेवण्यासाठी आवश्यक आहे. कारण व्हिटॅमिन 'डी' चे सेवन केल्याने गुप्तांगपर्यंत रक्तप्रवाह चांगल्या प्रकारे होतो आणि यामुळे सेक्स लाईफ वाढते.

 • DIY Simple home remedies for Erectile dysfunction

  पालक

  हिरव्यागार पालक भाजीमध्ये फॉलिक अॅसिड असते, जे स्पर्मला मजबूत बनवते. नियमितपणे पालकाचे सेवन केल्यास सेक्स लाईफलासुद्धा फायदा होतो.

 • DIY Simple home remedies for Erectile dysfunction

  ब्रोकोली

  पालकाप्रमाणे ब्रोकोलीसुद्धा जननांगामध्ये रक्तप्रवाह वाढवून बेडर तुम्हाला उत्तम परफॉर्मर बनवते.

 • DIY Simple home remedies for Erectile dysfunction

  टोमॅटो 

  टोमॅटोमध्ये आढळून येणारे लायकोपिन नावाचे अँटीऑक्सीडेन्ट एक नैसर्गिक कामेच्छा बूस्टर म्हणून ओळखले जाते. शीघ्रपतन किंवा कमजोरी नष्ट करून पौरुषत्व वाढवण्यामध्ये अत्यंत प्रभावी आहे. हे प्रोस्टेट कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी आणि इरेक्टाइल डिसफंक्शनच्या लक्षणांमध्ये सुधार करण्यास मदत करते.

Trending