Home | Business | Industries | dlf sales his some property for dcreases loan

वाढत्या कर्जाच्या डोंगरामुळे डीएलएफ कंपनी मालमत्ता विकणार

agency | Update - May 30, 2011, 12:30 PM IST

डीएलएफवर सध्या एकून सुमारे २४ हजार करोड रुपये कर्ज झाले आहे. हे कर्ज फेडण्यासाठी कंपनी आपली वेगवेगळ्या ठिकाणावरील मालमत्ता विकण्याच्या विचारात आहे. कंपनी पाच आयटी पार्कसह काही हॉटेल तसेच नवीन खरेदी केलेली जागा, मालमत्ता विकण्याच्या निर्णयापर्यंत आली आहे.

  • dlf sales his some property for dcreases loan

    dlf_288भारतातील सर्वांत मोठी रियल इस्टेट कंपनी डीएलएफ सध्या कर्जाच्या विळख्यात सापडली असून, कंपनीवर दिवसेंदिवस कर्जाचा डोंगर उभा राहत असल्याचे दिसून येत आहे. डीएलएफवर सध्या एकून सुमारे २४ हजार करोड रुपये कर्ज झाले आहे. हे कर्ज फेडण्यासाठी कंपनी आपली वेगवेगळ्या ठिकाणावरील मालमत्ता विकण्याच्या विचारात आहे. कंपनी पाच आयटी पार्कसह काही हॉटेल तसेच नवीन खरेदी केलेली जागा, मालमत्ता विकण्याच्या निर्णयापर्यंत आली आहे.
    एवढे करुनही कंपनीचे पूर्ण कर्ज फिटणार नसून या सर्व मालमत्तेतून कंपनीला केवळ सात हजार कोटी रुपयापर्यंत रक्कम मिळेल. कंपनीवर केवळ कर्जच वाढत नसून न भरलेला टॅक्सही कंपनीला डोकेदुखी ठरत आहे. कंपनीला सुमारे १७०० कोटी रुपये टॅक्स भरणे आहे. त्यामुळे कंपनीचा नफा खाली आला असून गेल्या वर्षाच्या तुलनेत तो खूपच खाली आला आहे. कंपनीचा या तिमाईतील नफा ३४४ कोटी रुपये आहे तर, तो गेल्यावर्षी ४२६ कोटीच्या घरात होता.
    असे असले तरी कंपनीच्या एकून उत्पन्नात भरीव वाढ झाली असून गेल्या वर्षी कंपनीचे उत्पन्न १९९४ कोटी रुपये होते, तर यंदा त्यात वाढ होऊन ते २६८३ कोटी रुपयांवर पोहचले आहे.

Trending