आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • DMK Chief MK Stalin To Pm Narendra Modi, India Is Not Hindi Speaking States Alone

'हा देश फक्त हिंदी भाषीकांचाच नाही तर आमचा पण आहे, केंद्राने आमच्याकडे काना-डोळा करू नये'- एम.के. स्टॅलिन

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नई(तमिळनाडू)- लोकसभा निवडणुकीत आपल्या पक्षाने चांगली कामगिरी केल्यामुळे उत्साहित झालेले द्रमुक अध्यक्ष एम.के. स्टॅलिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडले आहे. ते म्हणाले की, ''हा देश फक्त हिंदी भाषीकांचाच नाहीये, लोकसभा निवडणुकीत सगळ्या राज्यांना बरोबरीनेच पाहायला हवे, कोणत्याच राज्याकडे काना-डोळा करू नये.''

 

निवडणुकीत भाजपने हिंदी भाषीक राज्य मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरातसारख्या राज्यात सगळ्या जागा जिंकल्या आहेत. तर, द्रमुकने तमिळनाडुमध्ये 39 पैकी 23 जागा जिंकल्या आहेत, तर भाजपने या राज्यात एकही जागा मिळवली नाही. 2014 मध्ये द्रमुक एकही जागा जिंकू शकला नव्हता तर भाजपाने एक जागा जिंकली होती. यावेळी तमिळनाडुत द्रमुकने काँग्रेससोबत इतर स्थानिक पक्षांना एकत्रित करून 39 पैकी 37 जागा जिंकल्या आहेत.


भाजपविरूद्ध दुसऱ्या राज्यातही तमिळनाडू फॉर्म्यूला आणणार
स्टॅलिन यांनी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना एक खुले पत्र लिहीले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, त्यांचा पक्ष इतर राज्यांमध्येही स्थानिक पक्षांच्या मदतीने भाजपला टक्कर देईल. पक्ष ज्या रणनितीनुसार तमिळनाडुत निवडणूक लढला आहे, तोच फॉर्म्यूला भाजपविरूद्ध इतर राज्यांमध्येही केला जाईल. पुढे ते म्हणाले की, आता ते दिवस गेले, जेव्हा फक्त हिंदी भाषीय राज्यच भारतावर राज्य करायचे.


 

बातम्या आणखी आहेत...