DNA test / बलात्कारातून जन्मलेल्या बाळाची ‘डीएनए’ चाचणी, आरोपीविरोधात ठोस पुरावा मिळण्यसााठी घेण्यात आली टेस्ट

साक्री तालुक्यातील धोंगडेपाडा येथील घटना, आरोपीला करण्यात आली अटक 
 

प्रतिनीधी

Jun 11,2019 07:12:00 AM IST

धुळे - साक्री तालुक्यातील धोंगडेपाडा येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कारातून जन्माला आलेल्या बालिकेची डीएनए चाचणी करण्यात आली. त्याचे नमुने तपासण्यासाठी नाशिकच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. तसेच कथित जात पंचायतीला कायदेशीर समज दिली.


धाेंगडेपाडा गावाने बहिष्कृत केल्यानंतरही पिंपळनेर ग्रामीण रुग्णालय व नंतर हिरे रुग्णालयात दाखल झालेल्या पीडित मुलीने बालिकेला जन्म दिला आहे, तर पीडितेवर बलात्कार करून मातृत्व लादणाऱ्या बाळा अब्राहम सहाने याला अटक केली आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. पीडिता व नवजात बालिकेला न्याय मिळवून देण्यासाठी डीएनए चाचणीचा विषय पुढे आला. त्यानंतर नाशिक येथून डीएनए टेस्टसाठी किट मागवण्यात आली. त्यानंतर नवजात बालिकेचे रक्ताचे नमुने घेतले आहेत, तर संशयित बाळा सहाने याच्या रक्ताचे नमुने आधीच घेण्यात आले आहेत. बाळा सहाने हाच बालिकेचा पिता असल्याचे सिद्ध व्हावे म्हणून प्रयोगशाळेत दोघांच्या रक्ताचे नमुने व डीएनए पाहिले जाणार आहेत. हे नमुने नाशिक येथील प्रयोगशाळेत पाठवले आहेत. तशी माहिती न्यायप्रविष्ट असलेल्या या खटल्यासंदर्भात पोलिसांनी दिली आहे.पीडितेला न्याय मिळणे गरजेचे आहे. बाळा यानेच तिच्यावर मातृत्व लादले हे डीएनए चाचणीद्वारे सिद्ध करण्यासाठी ठोस पुरावा ठरेल, असे पीडितेचे वकिलांनी सांगितले.

X
COMMENT