आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुूळे मुलं झाल्याने आनंदी होते कपल, रजिस्ट्रेशनसाठी जेव्हा मुलांचा डीएनए टेस्ट केला, रिपोर्ट पाहून वडिलांना बसला धक्का

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शियामेन(चीन)- चीनमधील शियामेनमध्ये एका महिलेने जुळ्यांना जन्म दिला. जुळे मुलं झाल्याने ते कपल खूप आनंदी होते, पण जेव्हा मुलांच्या बर्थ रजिस्ट्रेशनसाठी पॅटर्निटी टेस्ट केली, तेव्हा रिपोर्ट पाहून वडिलांना बसला जोरदार धक्का. डीएनए टेस्टमध्ये दोघांचा डीएनए वेगवेगळा निघाला. म्हणजेच दोन्ही मुले वेगवेगळ्या व्यक्तींकडून झालेली होती. या सर्व प्रकारानंतर मुलांच्या आईने सत्य सांगितले.


रिपोर्टपाहून नाराज झाला व्यक्ती
- घटना शियामेन सिटीची आहे. स्टेट हेराल्ड न्यूजपेपरनुसार, प्रकरण तेव्हा समोर आले, जेव्हा कपल आपल्या मुलांच्या बर्थ रजिस्ट्रेशनसाठी लोकल पोलिस स्टेशनमध्ये गेले.
- रजिस्ट्रेशन पूर्ण करण्यासाठी कपलला पुरावा म्हणून पॅटर्निटी टेस्टच्या रिपोर्ट्स द्याव्या लागणार होत्या, तेने करून हे सिद्ध होईल की, मुले त्यांचीच आहेत.
- कपलची पॅटर्निटी टेस्ट करणारे फुजियान झेंगतई फॉरेंसिक आयडेंटिफिकेशन सेंटरच्या डायरेक्टरने सांगितले की, दोन्ही मुलांपैकी एका मुलाचा डीएनए वडील शियाओलोंगसोबत मॅच नाही झाला. 
- डायरेक्टर झांगने सांगितले की,  रिपोर्ट पाहून शियाओलोंगला राग आला आणि तो आपल्या बायकोशी भांडू लागला. सुरूवातीला तर पत्नी आपले कोणतेच अफेअर नाही असे सांगत होती. 

 

पत्नीने सांगितले सत्य
- जेव्हा व्यक्तीने आपल्या पत्नीला विचारले, तेव्हा तिने सत्य सांगितले की, तिने एका अज्ञात व्यक्तीसोबत एक रात्र घालवली आहे.
- हे ऐकल्यानंतर तो व्यक्ती आपल्या मुलाचा सांभाळ करण्यास तयार आहे, पण दुसऱ्या मुलाला सांभाळण्यास तयार नाहीये.
- चीनमध्ये अनेकवेळा अशी प्रकरणे समोर आली आहेत.


खूप तुरळक वेळी घडते असे
- जुळ्या मुलांची वेगवेगळे वडील असणे खूप रेअर गोष्ट आहे. याला हेटरपॅटर्नल सुपरफेकंडेशन (heteropaternal superfecundation) च्या नावाने ओळखले जाते. 
- तज्ञांनी सांगितले, एकाच दिवशी महिलेने दोन वेगवेगळ्या व्यक्तीशी शारिरीक संबंध बनवल्याने असे घडते, यात दोन्ही पुरूषांचे बीज महिलेच्या शरीरात जाते.

बातम्या आणखी आहेत...