आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सनदी लेखापालांच्या ज्ञानसागर राष्ट्रीय परिषदेला शेगाव येथे ११ पासून सुरुवात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- जीएसटी सोबतच करप्रणालीमध्ये होत असलेल्या बदलांची माहिती सनदी लेखापालांना व्हावी या उद्देशाने सनदी लेखापाल अकोला शाखेच्या वतीने शनिवार, ११ व रविवार १२ ऑगस्ट रोजी शेगाव अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात 'ज्ञानसागर' राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. सुमारे ७०० सीए यात सहभागी होणार असल्याची माहिती अकोला शाखेचे अध्यक्ष उमेश अग्रवाल यांनी मंगळवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत दिली. 


गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन होणार असून इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटन्स ऑफ इंडिया दिल्लीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रफुल छाजेड, वेस्टर्न इंडिया रिजनल काउन्सिल मुंबईचे अध्यक्ष संदीप जैन प्रमुख अतिथी राहतील. अध्यक्षस्थानी सीए के. श्रीप्रिया दिल्ली राहतील. सीए उमंग अग्रवाल, आनंद जाखोटिया, सचिन लाठी, जितेंद्र खंडेलवाल, अजय जैन उपस्थित राहतील. अकोला शाखेच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच राष्ट्रीय परिषद आयोजिण्याची संधी मिळाल्याचे अग्रवाल यांनी सांगितले. सुरुवातीला रमेश चौधरी यांनी परिषदेच्या आयोजनाबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे मुख्य संयोजक प्रकाश भंडारी, सहसंयोजक घनश्याम चांडक, हिरेन जोगी, भरत व्यास, मिथुन टेकाडे राहतील. 


जीएसटी ऑडिट व आर्थिक पत्रकांचा निपटारा एक समस्या या बाबत विमल जैन नवी दिल्ली, जीएसटी अंतर्गत संशोधन या विषयावर अशोक बत्रा नवी दिल्ली, जीवनाचा ताळेबंद या वर ग्यानवत्सल स्वामीजी अहमदाबाद, घोटाळ्याच्या स्थितीमध्ये अंकेक्षकाची भूमिका यावर मुकुंद चितळे मुंबई, आयकर अधिनियम २७० अ संदर्भात राजेंद्र मुंबई तर हिंदू अविभक्त कुटुंब व्यवस्थेविषयी डॉ. गिरीश आहुजा नवी दिल्ली विचार व्यक्त करतील. उमंग अग्रवाल नागपूर, आनंद जखोटिया पुणे, सचिन लाठी औरंगाबाद, जितेंद्र खंडेलवाल अमरावती, अजय जैन जळगाव यांचाही आयोजनात सहभाग असल्याचे सांगितले. भरत व्यास, मीना देशमुख खामगाव, दीपक अग्रवाल यांची उपस्थिती होती. 

बातम्या आणखी आहेत...