आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यशासाठी सर्वोत्कृष्ट बनून जे काही करता येईल ते करा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लहानपणी माझं सर्वात आवडतं खेळणं कार आणि चारचाकी गाड्या होत्या, म्हणूनच उदयपूरच्या प्रवासादरम्यान मी व्हिंटेज आणि क्लासिक कार यांचं प्रदर्शन असलेल्या संग्रहालयाला भेट देणं हा माझा पहिला आवडता पर्याय होता. जागतिक स्तरावर व्हिंटेज कार स्पर्धेत अनेक पुरस्कार जिंकणाऱ्या रोल्स रॉयस २० टूर सारख्या कार सार्वजनिक प्रदर्शनात होत्या. १०० वर्षे जुन्या जवळपास २३ गाड्या कार प्रेमींसाठी संग्रहालयाच्या एका भागात ठेवल्या होत्या. मला थोडीशी माहिती गोळा करण्यात आनंद वाटत होता आणि मनोज कुमार नावाचा व्यक्ती माझ्या प्रश्नांना उत्तरे देत होता. मग त्या संग्रहालयात माझा खरा प्रवास मनोजपासून सुरू झाला. सामान्यत: या संग्रहालयात ४०० रुपये इतकी प्रवेश फी असल्याने लोक फारसे येत नाहीत, पण जे येतात ते सेल्फी घेतल्यानंतर १५ मिनिटांपेक्षा कमी वेळात निघून जातात. अशा परिस्थितीत मनोजने मला चारचाकी गाड्यांबद्दल खूप चांगली माहिती देत होता म्हणूनच तो माझा मार्गदर्शक होता. त्याला केवळ इतिहासावरच नाही तर प्रत्येक कारच्या यांत्रिक तपशीलाबद्दल सखोल ज्ञान होते. मनोजने मेकॅनिक होण्यासाठी प्राधान्य दिले आणि अनेक वर्षे स्कूटर व कार दुरुस्त करण्यासाठी गॅरेजमध्ये काम केले. ८ वी उत्तीर्ण असूनही, त्याने शिकलेल्या मेकॅनिक कलेमुळे तो अष्टपैलू बनला आणि या गुणवत्तेमुळे तो उदयपूर पॅलेसमध्ये पोहोचला. पण, अमेरिका ते जर्मनी आणि जपानपर्यंतच्या जागतिक कार उद्योगाचा संपूर्ण इतिहास त्याच्या लक्षात होता त्यामुळे मला आश्चर्य वाटले. यानंतर मला प्रभावित करणारी पुढची व्यक्ती म्हणजे रिक्षाचालक उस्मान गनी होते. स्वत:चा परिचय करून देत ते म्हणाले, सर, माझा चेहरा पाहा आणि १९८० च्या दशकात 'ऑक्टोपस' या चित्रपटाचा एक सीन आठवा, ज्यात जेम्स बाँड-रॉजर मूर रिक्षात बसले होते आणि कबीर बेदीच्या गोळ्यापासून स्वत:चा बचाव करत होते. आपल्या रिक्षाच्या मागची सीट दाखवत तो म्हणाला, सर, इथेच जेम्स बाँड बसला होता. मग माझ्या लक्षात आले की चित्रपटातील रिक्षाचालकाचे चारित्र्य टेनिसपटू विजय अमृतराज यांनी साकारले होते आणि उदयपूरच्या रस्त्यावर तो अजूनही रिक्षा चालवत आहे हे कसे शक्य झाले? उस्मानचा चेहरा काळजीपूर्वक बघितला असता त्यात मला विजय अमृतराजांची खरोखरच एक झलक दिसली आणि तेच कारण आहे की तो त्याच्या देखाव्यामुळे उदयपूर येथे येणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करतो आणि लोक त्याच्याबरोबर सेल्फी घेतात. याव्यतिरिक्त, उस्मान अनेक परदेशी भाषा बोलतात आणि ही गोष्ट पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी देखील पुरेशी आहे. पण, मला आवडलेली गोष्ट म्हणजे जगातील कोणत्याही विषयावर चर्चा करण्याची त्याची हुशारीही होती. पुढचे १२ तास तो माझ्याशी वेगवेगळ्या विषयांवर बोलत होता आणि शहरातील रस्त्यावर फिरवत होता. मी सतत प्रवास करत असतो त्यामुळे मी बनावटी लोकांना ओळखू शकतो. पण, उस्मान खूप वेगळा होता. तो एका पुस्तकाप्रमाणे होता. माझ्यासाठी मनोज आणि उस्मान खूप कष्ट करणारे नव्हते, पण असे लोक होते जे सतत नवीन शिकत राहतात. दिवसभर आपल्या कामासोबतच नवीन गोष्टी जोडत जातात. ते दोघेही अतिशय आनंदी होते कारण दोघांचा फोकस हा पैसे किती कमवतो हा नव्हता तर ग्राहकांना आम्ही काय देऊ शकतो आणि आनंदी ठेवू शकतो हा होता. फंडा असा  तुम्ही आयुष्यात तुम्हाला जे करायचं आहे ते करा, पण तुम्ही ग्राहकांसाठी मूल्यांना धरून काम केलं तर यश कधीच तुमच्यापासून दूर जाणार नाही. मॅनेजमेंट फंडा एन. रघुरामन यांच्या आवाजात मोबाइलवर हिंदीत ऐकण्यासाठी टाइप करा FUNDA आणि SMS पाठवा 9200001164 वर मॅनेजमेंट फंडा एन. रघुरामन मॅनेजमेंट गुरू raghu@dbcorp.in  

बातम्या आणखी आहेत...