Home | Maharashtra | Mumbai | Do not be surprised if one of the party's chief of congress come in BJP: Chandrakant Patil

काँग्रेसच्या कार्याध्यक्षांपैकी एक भाजपत आल्यास आश्चर्य नको : चंद्रकांत पाटील

विशेष प्रतिनिधी, | Update - Jul 18, 2019, 09:31 AM IST

ईव्हीएम घोटाळा असता तर बारामती हरलो नसतो - चंद्रकांत पाटील

  • Do not be surprised if one of the party's chief of congress come in  BJP: Chandrakant Patil

    मुंबई - भाजपमध्ये येण्यास अनेक जण इच्छुक असून काँग्रेसने नुकतेच ५ कार्याध्यक्ष निवडले असून त्यापैकी एखादा लवकरच भाजपात आल्यास आश्चर्य वाटायला नको, असा धक्कादायक दावा भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. काँग्रेसमुक्‍त महाराष्‍ट्र करणे हीच प्रदेशाध्यक्ष म्‍हणून प्राथमिकता राहणार आहे. ईव्हीएममध्ये काही घोळ असता तर आम्ही बारामती हरलो नसतो. २०२४ मध्ये आम्ही बारामती जिंकू, असेही ते म्हणाले.


    भाजपने रावसाहेब दानवे यांच्या जागी चंद्रकांत पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदी तर मंगलप्रभात लोढा यांची मुंबई भाजप अध्यक्षपदी नियुक्‍ती केली. बुधवारी भाजप प्रदेश कार्यालयात मुख्यमंत्री फडणवीस यांनी पाटील आणि लोढांचा सत्कार केल्यानंतर पाटलांनी पदाचा कार्यभार स्वीकारला. शुक्रवारी मंगलप्रभात लोढा मुंबई कार्यालयात पदभार स्वीकारतील. चंद्रकांत पाटील हे पंतप्रधान मोदींचे सेनापती म्हणून त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आलेली असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी या वेळी काढले. लवकरच विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्याची तयारी आम्ही नव्याने सुरु करीत नसून ५ वर्षांपूर्वीच सुरु केली होती. आता ती मजबूत करून राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आणू, असा आशावाद पाटलांनी या वेळी व्यक्त केला. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणूक भाजपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालीच लढवणार असून दोघे मिळून काम करणार आहोत, असेही पाटील म्हणाले.

    शिवसेनेनेच नव्हे, भाजपनेही मोर्चे काढावे; त्यात गैर नाही
    जनतेच्या प्रश्नासाठी शिवसेनेनेच नव्हे तर भाजपनेही मोर्चे काढले पाहिजेत. शिवसेनेचा मोर्चा हा सरकारविरोधात नसून पीक विमा कंपन्यांविरोधात होता. त्यात चुकीचे काही नाही. मंत्रिमंडळाच्या बैठकीत पीक विमा कंपन्यांच्या नुकसानभरपाईचा आढावा घेतला असून कृषीमंत्र्यांनी एक चांगला प्रस्ताव सादर केला अाहे. सरकार प्रीमियम स्वीकारून विमा कंपन्यांना कागदपत्रांसाठी ठराविक रक्कम देऊन विम्याचे सेटलमेंट करण्याबाबतही विचार केला जाऊ शकतो, असेही चंद्रकांत पाटील या वेळी म्हणाले.

Trending