आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कोलकाता(पश्चिम बंगाल)- पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्यात वाद उफाळू आला आहे. ममता बनर्जींनी सोमवारी कूचबिहारमधील एका कार्यक्रमात एक विधान केले होते. त्या म्हणाल्या होत्या की, "अल्पसंख्यक समुदायातील काही कट्टरतावादी नेते आहेत, त्यांच्यापासून सावध राहा. त्यांच काहीच ऐकू नका." त्यांच्या या विधानावर उत्तर देताना ओवैसी म्हणाले की, "ममता बॅनर्जींच्या या वक्तव्यामधून भीती आणि निराशा दिसत आहे."
ममता म्हणल्या की, जसे हिंदूंमध्ये काही कट्टरतावादी आहेत, तसेच अल्पसंख्यकामध्येही काही कट्टरतावादी आहेत. एक राजकीय पक्ष आहे, तो भाजपकडून पैसे घेत आहे. त्या हैदराबादमधील कट्टरतावादी नेत्याचं काहीच ऐकू नका. अशा लोकांवर विश्वास ठेवू नका." त्यांच्या या वक्तव्यावर उत्तर देताना औवेसी म्हणाले की, "ममता बॅनर्जींच्या या वक्तव्यातून भीती आणि निराशा दिसत आहे. यातून दिसतं की, पश्चिम बंगालमध्ये एमआयएमची ताकत वाढत आहे."
मला शिव्या देऊन मुस्लिमांचा अपमान करत आहेत ममता- ओवैसी
ओवैसी पुढे म्हमाले की, "आम्ही न्याय आणि अधिकारांसाठी लढत आहोत. जर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांना यात कट्टरतावाद दिसत असेल, तर याचं मी काही करू शकत नाही. तुम्ही भाजपला राज्यात 18 जागा जिंकू दिल्या, यात कट्टरतावाद दिसतो. कट्टरतावाद तेव्हा आहे, जेव्हा सर्व मुस्लिमांनी तुम्हाला मतदान करुनही तुम्ही राज्यात भाजपला थांबवू शकत नाहीत. मला शिव्या देऊन तुम्हा राज्यातील मुस्लिमांचा अपमान करत आहात."
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.