गोवर, रुबेला लसीकरणासंदर्भातील / गोवर, रुबेला लसीकरणासंदर्भातील अफवांवर विश्वास ठेवू नका: उदय देवरे

महापालिकेचे शिक्षणाधिकारी उदय देवरे यांचे पालकांना आवाहन 

प्रतिनिधी

Dec 15,2018 09:40:00 AM IST

नाशिक- गोवर झाला की प्रतिकारशक्ती झपाट्याने कमी होते. त्यामुळे मुलांच्या शरीरात व्हिटामीन-एची कमतरता जाणवते. परिणामी बालकांची दृष्टी जाण्याची भीती असते. त्याव्यतिरिक्त डायरिया, न्यूमोनिया आदी आजार होण्याची शक्यता असते. नऊ महिने ते १५ वर्षे या वयोगटात रुबेलाचे रुग्ण आढळून येतात. रुबेला लसीकरणाच्या एका इंजेक्शनमुळे भावी पिढी आपण वाचवू शकतो. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता सर्वांनी आपल्या मुलांना लस्सीकरण द्यावे, असे आवाहन महापालिकेच्या शिक्षणाधिकारी उदय देवरे यांनी केले.

महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून जुन्या नाशकातील मुलतानपुरा उर्दू शाळेत आयोजित 'गोवर, रूबेला आजारांची माहिती, विद्यार्थ्यांना घ्यावयाची काळजी' या विषयीच्या कार्यशाळा व लसीकरणाच्या कार्यक्रमात उदय देवरे बोलत होते. यावेळी मुख्यध्यापक सगीर शेख, केंद्र प्रमुख सय्यद रिजवाना, सर्व शिक्षा अभियानाचे अमोल हिरे आदी उपस्थित होते.


यावेळी उर्दू शाळेच्या २७ विद्यार्थ्यांनी लसीकरण मोहिमेत सहभाग नोंदवला. तसेच महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये या लसीकरणाची मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी उदय देवरे यांच्या वतीने देण्यात आली.

X
COMMENT