Home | Business | Personal Finance | do not forget to check these before using any atm machine

ATM मधून पैसे काढताना नेहमीच चेक करा या 2 गोष्टी; अन्यथा खात्यातून पैसे गायब, अन् पत्ताही लागणार नाही

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 09, 2018, 12:06 AM IST

हॅकर्स आपल्या एटीएम कार्डचा डेटा चोरण्यासाठी स्कीमर मशीन आणि हिडन कॅमरा वापरतात.

 • do not forget to check these before using any atm machine

  बिझनेस डेस्क - फेस्टिव्ह सीझन सुरू असल्याने बाजारात लगबग सुरू आहे. अशात अनेक छोट्या-छोट्या गोष्टी विकत घेण्यासाठी सुद्धा एटीएम मशीन गाठावी लागते. अशात घाई-गर्दीचा गैरफायदा घेत कित्येक हॅकर्स आणि चोर आपल्या एटीएम कार्ड हॅक करून लाखोंची लूट करण्याच्या तयारीत आहेत. पुण्यातील कॉसमॉस बँकेतून हॅकर्सने 78 कोटी रुपये काढले होते. अशात आपण एटीएम मशीनमधून पैसे काढण्यासाठी जात असाल तर आपल्याला सावध राहावे लागेल. हॅकर्सकडून मशीनमध्येच असे डिव्हाइस लावले जात आहेत. ज्यातून आपल्या कार्डचा संपूर्ण डेटा चोरला जातो.


  अशी होते कार्डची क्लोनिंग
  हॅकर्स आपल्या एटीएम कार्डचा डेटा चोरण्यासाठी स्कीमर मशीन आणि हिडन कॅमरा वापरतात. स्कीमर मशीनला कुठल्याही एटीएम मशीनमध्ये कार्ड स्वाइप करण्याच्या ठिकाणी लावले जाते. अशात कुणीही कार्ड स्वाइप करताच त्याचा संपूर्ण डेटा स्कीमरमध्ये कॉपी होतो. यानंतर हिडन कॅमेरा आपण कोणता पिन टाकत आहात हे रेकॉर्ड करतो. याच माहितीच्या आधारे एक नवीन आणि डमी कार्ड बनवून आपल्या खात्यातून कुठळ्याही एटीएम मशीनमधून पैसे काढले जातात.


  बँक अधिकाऱ्याने केले सतर्क
  > ज्या एटीएम मशीनच्या ठिकाणी गार्ड नसेल तेथून कधीही ग्राहकांनी पैसे काढणे टाळणेच योग्य राहील.
  > ग्राहकांनी नेहमीच आपला ATM स्वतःच वापरावा. इतरांना पिन सांगून तो वापरण्यासाठी देऊ नये.
  > ATM कॅबिनमध्ये आपल्या व्यतिरिक्त आणखी कुणी थांबलेला असेल तर त्याला बाहेर जाण्यास सांगावे. यानंतरच एटीएम वापरावा.
  > ATM मशीनवर गेल्यानंतर जेथे कार्ड स्वाइप करायचा आहे, तो डिव्हाइस ओढून चेक करावा. ती क्लोनिंग मशीन असल्यास हाताने ओढल्यास वेळीच बाहेर येईल.
  > ATM मशीनमध्ये कार्ड स्वाइप करण्याच्या ठिकाणी हिरवा लाइट दिसून येतो. कार्ड परत येत नाही तोपर्यंत तो लाइट पेटत राहील. ग्रीन लाइट पेटत नसल्यास मशीनसोबत छेडछाड करण्यात आली असेल. अशात त्या मशीनचा वापर करू नये.

Trending