आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच वर्षांखालील बालकांना गाेड पेय पाजू नका!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जीवनाची सुरुवात करीत असलेल्या मुलांंच्या पाेषणासाठी संशाेधकांनी नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यानुसार नवजात मुलांना केवळ आईचे दूध किंवा डाॅक्टरद्वारे निश्चित करण्यात आलेला फाॅर्म्युला देण्यात यावा. वर्षभरानंतर गायीचे दूध देऊ शकता, पहिल्या पाच वर्षापर्यंत दूध आणि पाणी अधिक प्रमाणात द्यायला हवे, असे सुचवले आहे. अमेरिकन बाल अकॅडमी, न्यूट्रिशन आणि डायटेटिक्स अकॅडमी, अमेरिकी हार्ट असाेसिएशन तसेच अमेरिकी बाल दंतचिकित्सा अकॅडमी, पाेषण ग्रुप हेल्दी ईटिंग रिसर्च आणि राॅबर्ट वुड जाॅन्सन फाउंडेशन यांनी ही नवी मार्गदर्शक तत्त्वे निश्चित केली आहेत. अल्प उष्मांक असलेले आर्टिफिशियल गाेड पेय, चाॅकलेट दूध, फ्लेवर्ड दूध कॅफिनेटिड पेय यांचाही समावेश आहे. बदाम, तांदूळ किंवा जवसाचे दूधदेखील बाळाला पाजू नये. गायीच्या दुधाला पर्याय म्हणून साेया मिल्कचा वापर करू शकता. दरराेज कपभर फळांचा शुद्ध रस मुलांना देऊ शकता. मात्र शक्यताे न दिलेले बरे. मुलांना रसाएेवजी फळे खायला द्यावीत. अधिक रस प्राशन केल्याने दात सडतात आणि वजन वाढते. साेया मिल्क वगळता अन्य वनस्पती पिकांपासून बनवलेल्या दुधात पुरेसे प्राेटीन नसतात, असे संशाेधकांचे मत आहे.

बातम्या आणखी आहेत...