आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Do Not Ignore If Your Baby Breaths Like This, Uk Mother Warns Others About Fatal Condition

झोपलेल्या बाळाच्या श्वासात येत होता विचित्र आवाज, शर्टचे बटन काढताच हैराण झाली आई; जीवघेण्या रोगावर आता पालकांना करतेय Alert

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - ब्रिटनमध्ये राहणाऱ्या एका आईने आपल्या 4 आठवड्यांच्या मुलीला श्वास घेताना येणारा विचित्र आवाज व्हिडिओमध्ये कैद करून तो शेअर केला आहे. महिलेने सांगितले, की ती एक दिवस आपल्या छकुलीच्या शेजारीच झोपली होती आणि तिला अशा प्रकारचे आवाज आले. तिने वेळीच मुलीच्या शर्टचे बटन काढले तेव्हा ती मुलगी श्वास घेताना आणि सोडताना तिच्या बरगळ्या संकुचित होत होत्या. आपल्या मुलीची ही अवस्था पाहून महिलेने लगेच रुग्णालय गाठले. त्याच ठिकाणी डॉक्टरांनी तिच्या शरीरात ऑक्सिजन लेव्हल खूप कमी झाल्याचा खुलासा केला. तिला ऑक्सिजनची नितांत गरज होती. महिला या व्हिडिओच्या माध्यमातून अशा जीवघेण्या परिस्थिती पासून इतर पालकांना सावध करत आहे.


सुरुवातीला वाटले कफ झाला असावा...
ब्रिटनच्या चार्लीने सांगितले, की ती आपली मुलगी लूनाच्या शेजारी झोपली होती. त्याचवेळी तिला बाळाच्या श्वासात विचित्र आवाज ऐकायला मिळाला. सुरुवातीला तिला सर्दी किंवा कफचा त्रास असेल असे आईला वाटले. त्यामुळे, काही वेळ त्या आवाजावर दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला. थोड्याच वेळात हा आवाज आणखी वाढला. ती मुलगी दीर्घ श्वास घेण्याचा प्रयत्न करत होती आणि प्रत्येकवेळा आवाज वाढत होता. यानंतर मात्र चार्ली इतकी बेचैन झाली की तिला काहीच सुचत नव्हते. दुसऱ्याच क्षणी तिने छातीवर हात लावला तेव्हा आणखी घाबरली. यानंतर तिने बाळाचे शर्ट काढून पाहिले, तेव्हा श्वास घेण्यासह बाळाची छाती आणि एकूणच बरगळ्या संकुचित होऊन फुगत होत्या. तिला श्वास घेण्यात प्रचंड त्रास झाला होता. 


पालकांना केले अॅलर्ट
चार्लीने मुलीची अवस्था पाहून वेळीच रुग्णालय गाठले. तपास करणाऱ्या डॉक्टरांनी त्या मुलीला ब्राँकियोलायटिस (श्वसनाच्या नलिकेत सूज येणे) हा आजार झाल्याचे स्पष्ट केले. त्यामुळेच, बाळाच्या शरीरातील ऑक्सिजन खूप कमी झाले होते. तसेच तिला ऑक्सिजनचा कृत्रिम पुरवठा होण्याची नितांत गरज होती. डॉक्टरांनी रात्र लूनाला रुग्णालयातच ठेवून तिच्यावर उपचार केले. यानंतर चार्लीने यासंदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करून आपल्यासारख्या इतर मातांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. सोबतच बाळाच्या श्वसनात आवाज येत असल्यास त्याला फक्त सर्दी किंवा कफ समजून उपचार करू नका. तसेच थेट डॉक्टरांचा सल्ला घ्या असे तिने सांगितले आहे.

 

बातम्या आणखी आहेत...