डोळे होत असतील / डोळे होत असतील लाल तर करु नका दुर्लक्ष, असू शकतात ही 10 कारण

दिव्य मराठी वेब टीम

Nov 10,2018 12:00:00 AM IST

फक्त राग आणि रडल्यामुळेच डोळे लाल होत नाही तर यामध्ये गंभीर आजारही असू शकतात. श्री बालाजी अॅक्शन मेडिकल इंस्टीट्यूट नवी दिल्लीचे सीनियर कंसल्टेंट ऑप्थमोलॉजिस्ट डॉ. अदिति दुसाज सांगतात की, वारंवार अनेक वेळा डोळे लाल होत असतील. यासोबतच इरिटेशन, जळजळ, पाणी येण्यासारखी समस्या होत असेल तर तात्काळ डॉक्टरांना दाखवा. लाल डोळे जास्त दिवस अव्हॉइड करणे हानिकारक ठरु शकते. डॉ. दुसाज आज डोळे लाल होण्याची 10 कारण सांगत आहेत.


1. कॉर्नियल अल्सर
डोळ्यांच्या मधोमध लहान गोल आकाराला कॉर्निया म्हणतात. यावर एखादी जखम झाल्यास डोळे लाल होऊ शकतात.

2. ग्लूकोमा
या आजारात डोळ्यांवरील प्रेशर (इंट्राऑक्युलर प्रेशर) वाढते. यामुळे डोळे लाल होऊ शकतात.

3. आयराइटिस
डोळ्यांमध्ये कॉर्नियाच्या मागे आयरिस असतो. यामध्ये सूज येण्याला आयरायटिस म्हणतात. यामुळे डोळे लाल होऊ शकतात.

4. स्क्लेरायटिस
या आजारत डोळ्याच्या पांढ-या भागाची एखादी जागा लाल होऊ शकते. आर्थरायटिस, टीबी सारख्या पेशेंटमध्ये हे संकेत जास्त असतात.

5. एंडोफ्थलमायटिस
डोळ्यांच्या मागे कॉर्नियाच्या मागे आयरिस असते. यावर सूज येण्याला आयराइटिस म्हणतात. यामुळे डोळे लाल होऊ शकतात.

6. कंजक्टिवायटिस
व्हायरस किंवा बॅक्टेरियामुळे कंजक्टिवायटिस म्हणजेच डोळे येण्याची समस्या होऊ शकते. यामुळे डोळे लाल होऊ शकतात.

7. अॅलर्जी
डस्ट, धुर, पाळीव प्राणी, शाम्पू, स्विमिंग पूलच्या पाण्यातील क्लोरीन इत्यादी गोष्टींच्या अॅलर्जीमुळे डोळे लाल होऊ शकतात.

8. औषधी
स्लीपिंग पिल्स, पेन किलर्स, डिप्रेशन दूर करणारे औषध किंवा अँटी एलर्जिक मेडिसिन्समुळे डोळे लाल होऊ शकतात.

9. मोनोपॉज
मोनोपॉजच्या एजमध्ये पोहोचलेल्या महिलांमध्ये हार्मोनल इम्बॅलेन्समुळे डोळे ड्राय आणि रेड होऊ शकतात.

10. कॉन्टॅक्ट लेन्सेस
वारंवार कॉन्टॅक्ट लेन्स लावल्याने आणि काढल्यामुळे डोळ्यात इरिटेशन, ड्रायनेस आणि रेडनेस होऊ शकते.

X
COMMENT