आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंपनीच्या या मेलला करू नका इग्नोर, नाहीतर कट होईल सॅलेरी...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- तुम्ही जर प्रायव्हेट कंपनीत काम करत असाल तर कंपनीकडून येणारा प्रत्येक मेल चेक केला पाहीजे. कंपनीकडून येणारे हे मेल तुमच्या फायद्याचे ठरू शकतात. जर तुम्ही हे मेल चेक केले नाही तर तुम्हाला नुकसानीचा सामना करावा लागु शकतो. सगळ्या प्रायव्हेट कंपनीत इनव्हेस्टमेंट प्रुफ देण्यासाठी या मेलची सुरूवात केली आहे. त्यामुळे तुमच्या कंपनीचे अकाउंट डिपार्टमेंट तुम्हाला एक निश्तीत तारखेपर्यंत प्रुफ देण्याचा मेल करू शकतात.

 
इन्वेस्टमेंट प्रूफ देण्यामागचे कारण 
जर तुम्ही या मेलला इग्नोर केले तर, टॅक्स कट करूनच तुमच्या अकाउंटमध्ये सॅलेरी जमा होईळ. तुम्हाला वाटत असेल की, तुमची सॅलेरी कट होऊ नये तर तुम्हाला इनव्हेटमेंट प्रुफ द्यावे लागेल. आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी सगळ्या कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांकडून इनव्हेटमेंट प्रुफ मागत आहेत, म्हणजे ते तुमच्याकडून टॅक्स वाचवण्यासाठी केलेल्या पर्यायाची तपासणी करू शकतात. 


हे डॉक्यूमेंट्स जमा करावे लागतील
हेल्थ पॉलिसी संपण्यापूर्वी तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी याचा उपयोग केला असेल तर त्याच्या पावत्या द्याव्या लागतील. त्याशिवाय एखादा हेल्थ चेकअप केलेल्या बीलाची पावती द्यावी लागेल. त्याशिवाय कर्मचाऱ्यांनी नॅशनल पेंशन सिस्टम, नॅशनल सेविंग स्कीम, म्युचुअल फंड, पीपीएफमध्ये पैसे गुंतवले असतील तर त्याचे प्रुफ द्यावे लागतील.


HRA भरून करू शकता टॅक्स सेव्हिंग
जर कर्मचारी किरायाच्या घरात राहत असेल तर टॅक्स लागणार नाही. त्यासाठी कर्मचाऱ्यांना किरायाच्या घराची पावती द्यावी लागेल. जर कर्मचारी 8 हजार किंवा त्यापेक्षा जास्तीचा किराया भरत असेल तर HRA भरून टॅक्स सेव्हिंग करू शकता.

बातम्या आणखी आहेत...