Home | National | Other State | Do not invite me if you are going to celebrate Tipu Jayanti: Minister Hegde

टिपू जयंती साजरी करणार असाल तर मला निमंत्रण नकाे : मंत्री हेगडे

वृत्तसंस्था | Update - Nov 07, 2018, 10:21 AM IST

कर्नाटक सरकारने सोमवारी टिपू सुलतानची जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • Do not invite me if you are going to celebrate Tipu Jayanti: Minister Hegde

    बंगळुरू - कर्नाटकमध्ये टिपू सुलतान जयंती साजरी करण्यावरून पुन्हा एकदा राजकारण तापू लागले आहे. कर्नाटक सरकारने सोमवारी टिपू सुलतानची जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयास भाजपने गेल्या वर्षीप्रमाणेच विरोध दर्शवला .
    राज्य सरकारने टिपू सुलतान जयंती साजरी करण्याचा निर्णय मागे घ्यावा. या निर्णयास अहंकाराशी जोडून बघू नये. टिपू सुलतान यांची जयंती १० नोव्हेंबर रोजी आहे.

    उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर यांनी जयंती साजरी करण्याच्या तयारीवरून राज्यातील अधिकाऱ्यांसोबत एका बैठकीचे आयोजन केले. त्यांनी सर्व जिल्ह्यांत टिपू जयंतीचा समारंभ आयोजित करण्याचे निर्देश दिले. परमेश्वर म्हणाले, सरकार टिपूू सुलतानची जयंती साजरी करणार आहे. आतापर्यंत अनेक धरणे-आंदोलने झाली. ती आंदोलने समर्थनार्थ किंवा विरोधात होती. राज्य सरकारने सुरक्षेसाठी केंद्राकडे आरएएफच्या अतिरिक्त १० तुकड्या पाठवण्याची विनंती केली आहे. दुसरीकडे केंद्रीय मंत्री व कर्नाटकातील भाजपचे खासदार अनंत हेगडे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले, जयंतीशी संबंधित कोणत्याही समारंभाचे निमंत्रण मला देऊ नका.

Trending