Home | Maharashtra | Western Maharashtra | Ahmednagar | Do not mention name of Maharashtra government on Sai sansthan vehicles; notice of RTO

साई संस्थानच्या वाहनांवर महाराष्ट्र सरकारचे नाव नकाे; आरटीओची नोटीस

प्रतिनिधी | Update - Sep 01, 2018, 11:49 AM IST

साईबाबा संस्थानच्या वाहनांवर टाकलेले 'महाराष्ट्र शासन' हे नाव काढा; अन्यथा वाहनांची नोंदणी रद्द करू, अशी नोटीस श्रीरामपू

  • Do not mention name of Maharashtra government on Sai sansthan vehicles; notice of RTO

    शिर्डी- साईबाबा संस्थानच्या वाहनांवर टाकलेले 'महाराष्ट्र शासन' हे नाव काढा; अन्यथा वाहनांची नोंदणी रद्द करू, अशी नोटीस श्रीरामपूर आरटीओने संस्थानच्या कार्यकारी अधिकाऱ्यांना बजावली.


    संस्थानच्या एमएच १७ एजे ८८८८९ व एम एच १७ बीव्ही १५१० या दोन कारवर महाराष्ट्र शासन असे नाव असल्याबाबत संजय काळे यांनी २८ ऑगस्टला मेलवर तक्रार केली होती. परिवहन अधिकारी अ. अ. खान यांनी तिची त्वरित दखल घेतली. वाहनावर महाराष्ट्र शासन लिहिणे ही बाब गंभीर आहे. नाव काढून टाकून सात दिवसांच्या आत कळवावे. मुदतीत खुलासा सादर न केल्यास आपले काही म्हणणे नाही, असे गृहित धरून वाहनाची नोंदणी रद्द करण्यात येईल, अशी नोटिशीत म्हटले आहे.


    दरम्यान, संस्थान सरकारच्या अधिपत्याखाली आहे. मी सरकारची प्रतिनिधी म्हणून प्रतिनियुक्तीवर आहे. नोटिशीसंदर्भात आरटीओंशी चर्चा झाली आहे. मी वापरत असलेले वाहन सोडून अन्य वाहनांवरील नाव काढण्यास सांगितले आहे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी रूबल अग्रवाल यांनी स्पष्ट केले.

Trending