आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धाेनी, निवृत्तीचा विचार मनात आणू नका : गान कोकिळा लता मंगेशकर यांचा सल्ला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - टीम इंडियाच्या कर्णधार विराट काेहलीचे मत हे वर्ल्डकपचे नाॅकआऊट सामने आयपीएलच्या प्लेऑफ फाॅरमॅटच्या आयाेजनाच्या बाजूने आहे. कारण, आयपीएलमध्ये टाॅप-२ संघांना प्लेऑफमध्ये पराभवानंतरही फायनलची संधी असते. त्यामुळेच दाेन्ही संघांच्या पुन्हा एकदा अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित करण्याच्या आशा कायम असतात. त्यासाठी ते संघ  प्रयत्नशीलही राहू शकतात. यंदाच्या विश्वचषकातील पहिल्या उपांत्य सामन्यात भारतीय  संघाला पराभवाला सामाेरे जावे लागले. न्यूझीलंडने बुधवारी १८ धावांनी भारतावर मात केली.


‘आगामी काळात  चाहत्यांचा कल वाढवा आणि क्रिकेटलाही चालना  मिळावी, यासाठी नव्या फाॅरमॅटची गरज आहे. यासाठी आयपीएलच्या प्लेऑफचा फाॅरमॅट अधिक साेपा आणि महत्त्वपूर्ण  ठरणारा आहे,’अशी प्रतिक्रिया काेहलीने दिली. न्यूझीलंड संघाविरुद्ध उपांत्य सामन्यात सुरुवातीच्या ४५ मिनिटांत केलेल्या सुमार फलंदाजीमुळे आम्हाला पराभवाला सामाेरे जावे लागले,असेही त्याने सांगितले. आता २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेचे भारतीय संघ यजमानपद भूषवणार आहे.


धाेनी, निवृत्तीचा विचार मनात आणू नका
भारतरत्न लता मंगेशकर यांनी टीम इंडियाला विश्वचषकात झालेल्या पराभवानंतर सावरणारी प्रतिक्रिया दिली. तसेच त्यांनी माजी कर्णधार महेंद्रसिंह धाेनीला निवृत्तीचा विचार मनातही न आणण्याचा सल्ला दिला. यासाठी त्यांनी त्याला  याबाबत विनंतीही केली. सध्या धाेनीच्या निवृत्तीच्या चर्चेला उधाण आले आहे. मात्र,त्याने दुजाेरा दिला नाही. 

बातम्या आणखी आहेत...