आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Do Not Us Same Oil More Than Three Times, Causing Cancer

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एकाच तेलात तीनपेक्षा जास्त वेळ तळलेल्या अन्नाने होत आहे कँसर, तेलाचा वापर करणे म्हणजे विषाची परीक्षा घेणे...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमृतसर- गरम जिलबी, समोसे, भटूरे, खस्ता कचोरी, भजे आणि पनीरला तळुन खाण्याची मजाच वेगळी आहे. अशा अन्नपदार्थांच्या हॉटेलवर दिवसभर गर्दी पाहायला मिळते, पण बहुतांश लोकांना माहित नसते की, हे तेल परत परत वापरलेले आहे आणि हे आपल्या शरिरासाठी खुप नुकसान पोहचवणारे आहे. आता असे करणाऱ्यावर स्वास्त्य भिभाग कारवाई करणार आहे. स्टेट फूड अँड ड्रग कमिश्नर काहन सिंह पन्नू यांच्या आदेशानंतर बुधवारी विभागीय टीमने अनेक दुकानात छापे मारले. विभागाने लोकांना घरातील तेलही एककदाच वापरण्याचा सल्ला दिला आहे.


विषापेक्षा नाही कमी
जिल्हा आरोग्य आधिकारी डॉ. लखबीर सिंग भागोवालिया यांना सांगितले की, खायच्या तेलाला 3 पेक्षा जास्त वेळा तळल्यावर त्यात ट्रांस फॅटी अॅसिड बनते. टोटल पोलर मॉलिक्यूलच्या रूपात ओळखल्या जाणारे हे अॅसिड तेलाला परत परत गरम केल्यामुळे 5 ते 10% वाढते. अशा तेलातून बनलेले पदार्थ खाल्याने किडीनी, फुफ्फुसाचे रोग, अलजायमर आणि कँसरसारखा आजार होण्याची शक्यता असते.


कुकिंगची योग्य पद्धत
डॉ. भागोवालिया म्हटले की, जर तेलाचा परत वापर करायचा असेल तर त्याला कपड्यातून गाळून घ्या. तेलाला तळण्यासाठी लोखंड किंवा कॉपरच्या धातुच्या कढईचा वापर करू नका.