आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपल्या ज्ञानाचा चुकीच्या ठिकाणी उपयोग करू नये अन्यथा अडचणी वाढतात 

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एका गावात चार ब्राह्मण मित्र राहत होते. एक दिवस चौघांनीही विचार केला की, आपण एखाद्या गोष्टीचे ज्ञान घेऊन पारंगत व्हायला हवे. त्यामुळे ते चौघे वेगवेगळ्या दिशेला ज्ञानाचा शोध घेण्यासाठी निघाले. गावाच्या बाहेर गेल्यानंतर सर्वांनी ठरवले की, पाच वर्षानंतर सर्वांनी याच ठिकाणी भेटायचे.


पाच वर्षानंतर चौघेही ठरवलेल्या ठिकाणी परत आले. थोड्याशा गप्पा गोष्टी करून चौघे मित्र जंगलाच्या दिशेने आपल्या गावाकडे निघाले. थोडे पुढे जाताच त्यांना एका सिंहाचा सापळा दिसला. त्यामुळे सर्वजण सापळ्याजवळ गेले. तिथे एका मित्र म्हणाला की, मी या हाडांना जोडून सिंहाची रचना करू शकतो. असे म्हणून त्याने लगेच सिंहाचा सापळा पुन्हा जोडून तयार केला. यावर दुसरा मित्र म्हणाला मी यात त्वचा, मांस आणि रक्त भरू शकतो. दुसऱ्या ब्राह्मणाने आपल्या विद्येने सिंहाचे शरीर बनवले. आता तो सिंह जीव नसलेला सिंह होता. आपल्या मित्रांचे कौशल्य पाहून तिसरा मित्र थोड त्वेषानेच म्हणाला की, मी आपल्या विद्येने यामध्ये प्राण आणू शकतो.


हे ऐकताच चौथा मित्र म्हणाला असा मूर्खपणा करू नको. हा सिंह जर जिंवत झाला तर आपल्या सर्वांना खाऊन टाकेल.  तीसऱ्या मित्राला राग आला आणि तो म्हणाला या दोघांनी आपल्या ज्ञानाचे प्रदर्शन केले आहे, मला सुद्धा दाखवायचे आहे की, मी काय करू शकतो. असे म्हणून त्याने मंत्राचा जाप सुरू केला. हा प्रकार बघून चौथा घाबरला आणि पळत जाऊन एका झाडावर बसला. काही वेळेतच सिंह जिंवत झाला. त्यामुळे हे तिघे मित्र प्रचंड घाबरले, त्या सिंहाला आता खूप भुक लागल्यामुळे त्याने या तिघांवर हल्ला केला आणि आपले भक्ष्य बनवले. चौथा मित्र झाडावर असल्यामुळे त्याचे प्राण वाचले.


कथेची शिकवण
आपल्या ज्ञानाचे चुकीच्या ठिकाणी प्रदर्शन करू नये. चुकीच्या ठिकाणी ज्ञानचा उपयोग केला तर आपल्याला अडचणींचा सामना करावा लागेल.

बातम्या आणखी आहेत...