आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजळगाव - शहरभरात कचऱ्याची समस्या गंभीर झालेली अाहे. त्यात दाेन दिवसापासून पाऊस पडत असल्याने कचरा सडत अाहे. त्यामुळे शहरातील नागरिकांचे अाराेग्य धाेक्यात येत अाहे. डेंग्यूमुळे बालकाचा मृत्यू झालेला अाहे. संपूर्ण शहराची स्वच्छता करा. अाणखी नागरिकांच्या मरणाची वाट पाहू नका, मनुष्यबळ नसेल तर इतर विभागातील ७० कर्मचाऱ्यांना अाराेग्य विभागात घ्या, अशा शब्दात अामदार सुरेश भाेळे यांनी महापालिकेच्या अाराेग्य विभागाला शनिवारी सूचना दिल्या.
शहरातील अस्वच्छतेचा व साथीच्या राेगांचा प्रसार हाेत असल्याच्या माहितीवरून शनिवारी संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास अामदार सुरेश भाेळे यांनी महापालिका गाठली. या वेळी महापालिकेचे अायुक्त चंद्रकांत डांगे नसल्याने त्यांनी बांधकाम सभापतीच्या दालनात अाराेग्याधिकारी उदय पाटील व अाराेग्य विभागातील कर्मचाऱ्यांना बाेलावून या सूचना दिल्या.
अपूर्ण मनुष्यबळ
अाराेग्य विभागात मनुष्यबळाचा विषय येथे समाेर अाला. अाराेग्याधिकारी उदय पाटील यांनी मनुष्यबळ कमी असल्याची समस्या मांडली. त्यावर अामदार भाेळे यांनी किती कर्मचाऱ्यांची अावश्यकता अाहे? अशी विचारणा केली. त्यावर अाराेग्याधिकारी पाटील यांनी ७० एवढे सांगितले. त्यावर अामदार भाेळे यांनी आपात्कालीन परिस्थिती समजून इतर विभागातील ७० कर्मचारी अाराेग्य विभागाच्या कामासाठी घेण्याची सूचना त्यांनी या वेळी दिल्या अाहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.