Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | do not what cm devendra fadnavis has decided, reacts vijaysinh mohite patil

मुख्यमंत्र्यांचे काय ठरले ते मला काहीच माहिती नाही; फडणवीसांच्या वक्तव्यावर विजय सिंह मोहिते पाटील यांची प्रतिक्रिया

संदीप शिंदे, | Update - Jun 25, 2019, 04:08 PM IST

मंत्रिपदाच्या, अधिकृत भाजप पक्ष प्रवेशाच्या प्रश्नावर देखील बाळगले मौन

  • do not what cm devendra fadnavis has decided, reacts vijaysinh mohite patil

    माढा - राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी विजय सिंह मोहिते पाटील आणि आमचे अगोदरच ठरले असे म्हटले होते. फडणविसांच्या याच वक्तव्याचा आधार घेत दोघांमध्ये काय ठरले असा सवाल पत्रकारांनी केला. त्यावर पाटील यांनी आपल्याला यातील काहीच माहिती नसल्याचे म्हटले आहे. माढ्यात कार्यक्रमास आल्यानंतर मित्रप्रेम सदन येथे माजी आमदार धनाजी साठे यांची मोहिते पाटील यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी संवाद साधला.


    राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नऊ हा माढा शहराजवळून जाण्याच्या प्रश्नी संबंधित मंत्र्यांना भेटणार असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे. विखे पाटलांनी जसा भाजपात प्रवेश न करता मंत्रिपद मिळवले तसेच आपलेही समजायचे का? असा प्रश्न यावेळी त्यांना विचारण्यात आला तेव्हा त्यांनी उत्तर देणे टाळले. राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणार आहात का ? भाजपाचा पक्ष प्रवेश आपला केव्हा होणार? या प्रश्नावर देखील त्यांनी मौन पाळले. माढ्याच्या नगराध्यक्षा अॅड. मीनल साठे, नगरसेविका कल्पना जगदाळे, सुप्रिया बंडगर, अनिता सातपुते यांनी माढा विधानसभेचे भाजपचे तिकिट महिलांसाठी मिळावे अशी मागणी मोहिते पाटील यांच्याकडे केली. आपण भाजपच्या वरिष्ठ मंडळीकडे हा प्रश्न मांडण्याची दादा ना विनंती केली. यावेळी राजेंद्र चवरे, आनंद कानडे, संजय कोकाटे, नागनाथ कदम, विलास जगताप आदी उपस्थित होते. माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद कानडे यांच्या सदनावर जाऊन भेट घेत त्यांचा जन्मदिवसाच्या निमित्ताने सन्मान केला.

Trending