आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नव्या शंभर लढाऊ विमानांचा करार अदानी डिफेन्सशी केला तर नवल नकाे; चव्हाण यांची खरमरीत टीका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- राफेल घाेटाळ्याची चर्चा देशभर सुरू असतानाच या कराराला अंतिम स्वरूप देण्यात आले. कराराआधी अवघ्या बारा दिवसांपूर्वी अनिल अंबानी यांच्या रिलायन्स डिफेन्स कंपनीला ३० हजार काेटींचे काम देण्यात आले. मात्र, अाता नव्याने शंभर लढाऊ विमाने खरेदीची निविदा केंद्राने काढली असून, रिलायन्स डिफेन्सच्या स्थापनेपूर्वी अवघ्या तीन दिवस आधी स्थापन झालेल्या अदानी डिफेन्स अॅण्ड सिस्टिम्स लिमिटेडला ती देऊन त्यांच्यासोबत करार केला तर नवल वाटायला नकाे, अशी खरमरीत टीका राज्याच्ये माजी मुख्यमंत्री पुथ्वीराज चव्हान यांनी मंगळवारी येथे केली.


मंत्रिपदे, महामंडळांच्या सत्तेपुरती शिवसेनेची भूमिका 
पेट्रोल-डिझेल दरवाढीला भाजपसोबतच शिवसेनाही तितकीच जबाबदार आहे. त्यामुळे शिवसेनेला याबाबत बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. शिवसेना कोणतीही ठोस भूमिका नसलेला पक्ष असून मंत्रालयातील काही मंत्रिपदे आणि महामंडळांच्या सत्तेपुरती त्यांची भूमिका मर्यादित असल्याची टीकाही पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी पत्रकार परिषदेत केली. 


संरक्षण खात्यामध्येही खासगीकरणाचा प्रयत्न सुरू अाहे. खासगी क्षेत्राचा समावेश झाल्यानंतर गुप्तता कमी होऊन सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. नोटबंदीच्या माध्यमातून तीन ते चार लाख कोटींचा काळा पैसा सरकारकडे येईल, अशी आशा होती. सरकारने त्याच जोरावर बुलेट ट्रेनसारखे अनावश्यक मोठे प्रकल्प हाती घेतले. मात्र, नोटबंदीचा निर्णय फसल्याचे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या माहितीतून समोर आले आहे.

बातम्या आणखी आहेत...