आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

घाबरू नका, ही आघाडी दीर्घकाळ चालणार आहे; उद्धव ठाकरे यांचे आमदारांना संबोधन

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांसह राष्ट्रवादीच्या नेत्यांशी संवाद साधला. हॉटेल रिनेसॉमध्ये झालेल्या या भेटीत, चिंता करण्याचे काहीच कारण नाही, ही आघाडी (काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना) दीर्घकाळ चालणार आहे असे आमदारांशी संवाद साधताना उद्धव म्हणाले आहेत. आमदारांच्या समूहाला संबोधित करताना त्यांच्यासोबत शिवसेनेचे खासदार संजय राउत देखील उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे 44 आमदार सध्या रिनेसॉ हॉटेलमध्ये थांबले आहेत. महाराष्ट्रात शनिवारी भाजपने अजित पवारांच्या मदतीने सत्ता स्थापित केली. तेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेने आप-आपल्या आमदारांना वेग-वेगळ्या हॉटेलांमध्ये थांबवले आहे. या सर्व हॉटेलांबाहेर चोख सुरक्षा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला. राष्ट्रवादीचे आमदार माणिकराव काकाटे गेल्या दिवसभरापासून बेपत्ता होते. ते अजित पवारांसोबत राजभवनात गेले होते असेही सांगितले जाते. तेच काकाटे रविवारी सकाळपासून या हॉटेलात पोहोचले आहेत. दरम्यान, उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादीच्या आमदारांची भेट घेतली, तेव्हा संजय राउत, युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे, राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांचा एक फोटो समोर आला आहे.

बातम्या आणखी आहेत...